मुंबईच्या शिवाजी नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ट पोलीस निरीक्षक बाबुराव देशमुख एसीबीच्या जाळ्यात
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून एक लाख रुपयांचा पहिला हप्ता घेताना केली अटक


मुंबई: मुंबईच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस संरक्षण देण्यासाठी शाळेच्या एका संचालकाकडे एका लाख रुपयांची लाच लाख रुपयाची लाच स्वीकारणाऱ्या शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव देशमुख याला मंगळवारी एसीबी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. बाबुराव मधुकर देशमुख वय वर्ष ५७ असे या अधिकाऱ्याचे नाव असून गेल्या दोन वर्षांपासून ते शिवाजी नगर पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याचे समोर आले आहे.

काही दिवसा सोडत गोवंडी परिसरातील एका खासगी शाळेचा टाळा तोडून काही व्यक्तींनी अनधिकृतपणे प्रवेश केला होता. याबाबत शाळेच्या संचालकाने धर्मादाय आयुक्त आणि शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारदारांनी शाळेत बेकायदेशीरपणे प्रवेश करणाऱ्या व्यक्तींविरोधात कडक कारवाई आणि पोलीस संरक्षण देण्याची मागणी रीतसर निवेदन पत्र देऊन शिवाजी नगर पोलिसांकडे केली होती.

शाळेला संरक्षण देण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव मधुकर देशमुख यांनी शाळेच्या संचालक यांच्याकडे ३ लाख रुपये लाचेची मागणी केली होती. तीन लाख रुपये जास्त आहेत सांगून अडीच लाख रुपयांवर तडजोड झाल्यानंतर मंगळवारी अडीच लाखा पैकी एक लाख रुपयांचा पहिला हप्ता देण्यात येणार होता.

मात्र शाळेच्या संचालक यांना लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी सदर बाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागात याबाबत तक्रार केली होती. त्यानुसार एसीबी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून एक लाख रुपयांचा पहिला हप्ता घेताना शिवाजी नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ट पोलीस निरीक्षक बाबुराव देशमुख यांना मंगळवारी रंगेहाथ पकडले.




