आमची मुंबईमहाराष्ट्रमुंबईविशेषशैक्षणिकसामाजिक

मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीत नव्या नगरसेवकांची नियुक्ती

मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीत २६ सदस्यांची नियुक्ती

मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीत नव्या नगरसेवकांची नियुक्ती

मुंबई : दि. १६ फेब्रुवारी – मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीत ‘या’ नगरसेवकांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या प्रशासनाने याबाबत अधिकृत माहिती जाहीर केली असून नव्याने नियुक्त सदस्य लवकरच पदभार स्वीकारणार आहेत.

स्थायी समिती ही मुंबई महानगरपालिकेतील सर्वात महत्त्वाची आणि प्रभावी समिती मानली जाते. पालिकेच्या आर्थिक व्यवहारांपासून ते धोरणात्मक निर्णयांपर्यंत विविध विषयांवर अंतिम शिक्कामोर्तब करण्याचा अधिकार या समितीकडे असतो. विकासकामांना मंजुरी देणे, कोट्यवधी रुपयांच्या खर्च प्रस्तावांना मान्यता देणे, निविदा प्रक्रिया तपासणे तसेच महत्त्वाच्या प्रशासकीय निर्णयांवर भूमिका घेणे अशी जबाबदारी स्थायी समिती पार पाडते.

जाहीर करण्यात आलेल्या यादीत आमनी श्री. अशरफ, किलेदार श्री. यशवंत मारुती, कुरेशी श्री. मो. जासिर, खणकर श्री. गणेश दाताराम, खान डॉ. (श्रीमती) सईदा, गंभीर श्रीमती शीतल सुरेश, धोडे श्री. अभय अरुण, जाधव श्रीमती यामिनी यशवंत, जाधव श्रीमती राखी हरिश्चंद्र, जाधव श्रीमती श्रद्धा श्रीधर, झा श्री. शिवकुमार वासुकीनाथ, तिवाना श्री. ताजिंदर सतनामसिंग, शेखलालापटेल श्री. जगदीश मुकुंदनी यांसह बरेकर श्री. प्रकाश यशवंत, नाईक श्रीमती अंजली संजय, नांवकर अॅड. मकरंद सुरेश, पाटणकर श्रीमती मिनाक्षी अनिल, फणसे श्री. यशोधर पद्माकर, बडे श्रीमती दिव्याला बबन, भाटिया श्रीमती लक्ष्मी नितीन, भांदेरी श्री. हरीप, मिरांडा श्रीमती तुलिप ब्रायन, यादव श्रीमती अंजना रा., रहाटे श्री. रमाकांत सखाराम, शिंदे श्री. प्रभाकर आणि सातम श्रीमती प्रिती मनोज यांचा समावेश आहे.

नवीन सदस्यांच्या नियुक्तीमुळे समितीच्या कामकाजाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शहरातील प्रलंबित विकासकामे, पायाभूत सुविधा प्रकल्प आणि नागरिकांशी संबंधित महत्त्वाचे निर्णय या समितीच्या माध्यमातून लवकरच पुढे सरकतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, नव्याने नियुक्त नगरसेवकांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पारदर्शक कारभारासाठी कटिबद्ध असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. आगामी बैठकीत विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार असून सर्वांचे लक्ष स्थायी समितीच्या निर्णयांकडे लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button