मुंबई क्राइम : Anti-Corruption Bureau ची धडक कारवाई; कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजीव तावडे व पीएसआय रंगेहात अटकेत
3 लाख रुपयांची लाच मागितली होती. सुरुवातीला दोन लाख रुपये स्वीकारण्यात आले होते. मात्र उर्वरित 1 लाख रुपयांची रक्कम घेताना अटक

मुंबई क्राइम : Anti-Corruption Bureau ची धडक कारवाई; कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजीव तावडे व पीएसआय रंगेहात अटकेत

मुंबई (मालाड) : मालाड परिसरातील कुरार पोलीस ठाण्यात लाचखोरीचे गंभीर प्रकरण उघडकीस आले असून Anti-Corruption Bureau (एसीबी) ने सापळा रचत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव तावडे आणि एका पीएसआयला रंगेहात अटक केली आहे. या कारवाईमुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.
3 लाखांची मागणी; 2 लाख आधीच स्वीकारले
तक्रारदार वकील यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या क्लायंटचा गुन्हा नोंद करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तब्बल 3 लाख रुपयांची लाच मागितली होती. सुरुवातीला दोन लाख रुपये स्वीकारण्यात आले होते. मात्र उर्वरित 1 लाख रुपयांची रक्कम देताना तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली.

एसीबीचा सापळा आणि रंगेहात अटक
तक्रारीची प्राथमिक पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. ठरलेल्या ठिकाणी उर्वरित एक लाख रुपये स्वीकारताना अधिकाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आले. तत्काळ त्यांना ताब्यात घेऊन गुन्हा नोंद करण्यात आला.
गुन्हा दाखल; पुढील तपास सुरू
या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. न्यायालयात हजर करून पुढील कोठडीची मागणी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
पोलीस दलात खळबळ
गुन्हा नोंद करण्यासाठी लाच मागितल्याच्या आरोपामुळे पोलीस दलाच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. एसीबीकडून अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने केल्या जात असून, लाचखोरीविरोधातील मोहिमेला आणखी बळ मिळाल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरणाचा तपास पुढे सुरू असून आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




