खोजा जमातखाना शेजारील भूखंडावरील अतिक्रमणाविरोधात नगरसेवक रुपेश सावरकर यांची ठाम भूमिका; तात्काळ कारवाईचे निर्देश
जनतेच्या हक्कांसाठी रुपेश सावरकर ऍक्शन मोड मध्ये; वॉर्ड ६३ मध्ये गैरप्रकारांवर धडक मोहीम

मुंबई : सार्वजनिक हितासाठी राखीव असलेल्या खोजा जमातखाना शेजारील भूखंडावर सुरू असलेल्या अतिक्रमणाविरोधात भाजपचे वॉर्ड क्रमांक ६३ चे स्थानिक नगरसेवक रूपेश सावरकर यांनी ठाम भूमिका घेत तात्काळ कारवाईचे निर्देश दिले आहेत.

या भूखंडावर अतिक्रमण झाल्याची तक्रार प्राप्त होताच रूपेश सावरकर स्थानिक ओशिवरा पोलिस ठाण्याचे Oshiwara Police Station चे अधिकारी तसेच मुंबई महानगर पालिका के पश्चिम विभाग मधील संबंधित अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष स्थळाची पाहणी केली. सदर भूखंड सामाजिक व सार्वजनिक कल्याणकारी उपक्रमांसाठी अधिकृतपणे राखीव असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्ष पाहणीत या ठिकाणी सर्रास अतिक्रमण सुरू असल्याचे रूपेश सावरकर यांच्या निदर्शनास आले.

या गंभीर प्रकाराची तात्काळ दखल घेत संबंधित यंत्रणांना आवश्यक ती कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असून. अतिक्रमण लवकरात लवकर हटवून जागा मोकळी करून ती पुन्हा सामाजिक कार्य आणि सार्वजनिक हिताच्या उपक्रमांसाठी उपलब्ध करून देण्यात येईल, असा विश्वास नागरिकांना देण्यात आला.

या पाहणीवेळी ओशिवरा पोलीस ठाण्याचे अधिकारी, महापालिका अधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
“सार्वजनिक हितासाठी राखीव असलेली जमीन ही जनतेच्या सेवेसाठीच वापरली गेली पाहिजे. जनतेच्या हक्कांवर कुठलाही अन्याय सहन केला जाणार नाही,” असा ठाम इशाराही देण्यात आला.




