माजी विरोधी पक्षनेते ते स्वीकृत नगरसेवक — प्रविण छेडा यांचा राजकीय प्रवास
जनतेच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या छेडा यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड महानगरपालिकेत प्रविण छेडा यांचे दमदार पुनरागमन

माजी विरोधी पक्षनेते ते स्वीकृत नगरसेवक — प्रवीण छेडा यांचा राजकीय प्रवास
मुंबई महानगरपालिकेतील प्रभावी आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे पप्रविण छेडा यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाली असून त्यांच्या राजकीय प्रवासाला नवे पर्व लाभले आहे. माजी विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी सभागृहात सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत जनतेच्या प्रश्नांसाठी आक्रमक भूमिका घेतली होती.

विरोधी पक्षनेतेपदाच्या काळात त्यांनी रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सुविधा, शिक्षण आणि पावसाळी पूर्वतयारी यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला. विविध विकासकामांतील अनियमितता आणि आर्थिक बाबींवर त्यांनी प्रशासनाकडे कठोर भूमिका मांडत पारदर्शकतेची मागणी केली. कोविड काळात नागरिकांना योग्य आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
त्यांच्या या ठोस आणि अभ्यासपूर्ण कामगिरीच्या पार्श्वभूमीवर आता स्वीकृत नगरसेवक म्हणून त्यांच्याकडून आणखी प्रभावी कामाची अपेक्षा व्यक्त होत आहे. स्थानिक पातळीवरील प्रश्न सोडवणे, विकासकामांना गती देणे आणि प्रशासनावर आवश्यक तेथे अंकुश ठेवणे, या भूमिकेत ते सक्रिय राहतील असा विश्वास कार्यकर्ते आणि नागरिक व्यक्त करत आहेत.

प्रवीण छेडा यांच्या निवडीमुळे महानगरपालिकेच्या राजकारणात नवचैतन्य निर्माण झाले असून त्यांच्या अनुभवाचा लाभ मुंबईकरांना निश्चितच होईल, अशी भावना व्यक्त केली जात आहे.जनतेच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या छेडा यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड
महानगरपालिकेत प्रवीण छेडा यांची दमदार पुनरागमन असल्याची चर्चा मुंबई मध्ये सुरू झाली आहे



