“महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान सहन केला जाणार नाही.- आमदार अमित साटम (मुंबई भाजप अध्यक्ष)
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हरवर्धन सपकाळ यांना तात्काळ हटवा! भाजपचा आक्रमक इशारा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हरवर्धन सपकाळ यांना तात्काळ हटवा! भाजपचा आक्रमक इशारा
“महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान सहन केला जाणार नाही.- मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम
मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हरवर्धन सपकाळ यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानाशी केल्याचा आरोप करत मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान सहन केला जाणार नाही. सपकाळ यांची तात्काळ पदावरून हकालपट्टी करा,” असा थेट इशारा साटम यांनी दिला.

साटम यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधत स्पष्ट भूमिका जाहीर करण्याची मागणी केली. “मतांच्या राजकारणासाठी शिवरायांचा अवमान करणे हा महाराष्ट्र कधीच सहन करणार नाही,” असे ते म्हणाले.
दरम्यान, डोंबिवलीत भाजपच्या पश्चिम मंडळाच्या वतीने सपकाळ यांच्या विरोधात जोरदार आंदोलन छेडण्यात आले. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत काँग्रेसविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला. आंदोलनात अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
राज्यात या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत असून, भाजपने आक्रमक भूमिका घेत काँग्रेसवर दबाव वाढवला आहे. आता काँग्रेसकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



