सिटी इंटरनॅशनल स्कूल बंद निर्णयाविरोधात मनसेची तक्रार
वर्सोवा विधानसभा विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांनी मुंबई शिक्षण उपसंचालक कार्यालयात जाऊन दाखल केली अधिकृत तक्रार
मुंबई : सिटी इंटरनॅशनल स्कूल बंद निर्णयाविरोधात मनसेची तक्रार
वर्सोवा विधानसभा विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांनी मुंबई शिक्षण उपसंचालक कार्यालयात जाऊन दाखल केली अधिकृत तक्रार
मुंबईतील सुमारे ७०० विद्यार्थ्यांची संख्या असलेल्या सिटी इंटरनॅशनल स्कूल अचानक बंद करण्याच्या निर्णयाविरोधात आता राजकीय पातळीवरही हालचाली सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे वर्सोवा विधानसभा विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांनी मुंबई शिक्षण उपसंचालक कार्यालयात जाऊन अधिकृत तक्रार दाखल केली आहे.

शाळा कोणतीही ठोस पूर्वसूचना न देता बंद करण्याचा निर्णय घेतल्याने शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येत असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. पालकांमध्ये संभ्रम व नाराजीचे वातावरण असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच पश्चिम उपनगर शिक्षण निरीक्षकांनी संबंधित शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा सविस्तर आढावा घ्यावा आणि तत्काळ अहवाल सादर करावा, असेही देसाई यांनी मागणीपत्रात स्पष्ट केले आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी प्रशासनाने त्वरीत निर्णय घ्यावा, अन्यथा पुढील आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

#citiinternationalschool #sandeshdesaimns
#sandeshdesaiforversova



