आमची मुंबईमहाराष्ट्रमुंबईविशेषसंपादकीय

मुंबईत भाजपाचा भव्य विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन. “चला मुंबईत परिवर्तन घडवूया” या घोषवाक्याखाली होणार मेळावा

भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली संकल्प मेळाव्याचे आयोजन

मुंबई महानगर पालिका निवडणूक तयारीच्या अनुषंगाने मुंबईत भाजपाचा भव्य विजय संकल्प मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. “चला मुंबईत परिवर्तन घडवूया” या घोषवाक्याखाली हा मेळावा घेण्यात येत असून,  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे व्हिजन आणि महाराष्ट्रचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन यानुसार मुंबईच्या सुरक्षेसाठी, विकासासाठी आणि एक मिशनसाठी संकल्प केला जाणार आहे.

हा मेळावा येत्या मंगळवार, १६ सप्टेंबर रोजी सायं. ५:३० वाजता वरळी येथील NSCI Dome, सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये पार पडणार आहे. या मेळाव्यासाठी भाजपाने मोठ्या प्रमाणावर तयारी केली असून कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबईच्या भविष्यासाठी सुरक्षा आणि विकास यांना प्राधान्य देत हा मेळावा ऐतिहासिक ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

या संकल्प मेळाव्याचे आयोजन भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार असून मुंबई भाजपा अध्यक्ष म्हणून आमदार अमित साटम यांचा पाहिलाच जाहिर कार्यक्रम असणारे आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button