आमची मुंबईमहाराष्ट्रमुंबईवर्सोवा विधानसभाविशेषसामाजिक

थायलंडमधील “Angry Sardar” हॉटेलमध्ये कामासाठी गेलेल्या कामगारांना मुंबई मध्ये आणण्यात आले यश

हे सर्व राजसाहेब ठाकरे यांच्या दराऱ्यामुळेच शक्य झाले ' संदेश देसाई ( वर्सोवा विधानसभा -विभाग अध्यक्ष )

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्सोवा विधानसभा विभागाने एक मोठे काम उरकून दाखवले आहे. मुंबईतील काही भारतीय कामगारांना थायलंडमधील “Angry Sardar” हॉटेलमध्ये कामासाठी पाठविण्यात आले होते, मात्र तिथे पोहोचल्यानंतर कामगारांची अडचण वाढली. कामाच्या असुरक्षित परिस्थितीमुळे आणि करारातील विसंगतीमुळे हे कामगार अडकले होते.

कामगारांच्या कुटुंबीयांनी व मनसे पदाधिकाऱ्यांनी तातडीने ही बाब माननीय राजसाहेब ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवली. राजसाहेबांनी तत्काळ मनसेच्या पदाधिकाऱ्यांना याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले.

👉 मनसेच्या दणक्यामुळे आणि राजसाहेब ठाकरे यांच्या प्रभावामुळे थायलंडमध्ये अडकलेले हे कामगार परत आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि अखेर आज सर्व कामगार मुंबईत सुखरूप परतले.

या संपूर्ण प्रकरणात मनसे वर्सोवा विधानसभा अध्यक्ष संदेश देसाई यांनी माहिती देताना सांगितले की, “हे सर्व राजसाहेब ठाकरे यांच्या दराऱ्यामुळेच शक्य झाले. कामगारांच्या सुरक्षित परतीसाठी मनसेने जी मेहनत घेतली ती यशस्वी ठरली आहे.”

कामगार व त्यांच्या कुटुंबीयांनी राजसाहेब ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button