*अखेर पूनमनगर येथील पीएमजीपी इमारतीच्या पुनर्वसनाचा मुहूर्त ठरला डिसेंबर नंतर कामास सुरुवात*
- खासदार रविंद्र वायकर व उपाध्यक्ष तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जयस्वाल यांच्यात पार पडलेल्या बैठीकीत निर्णय

*अखेर पूनमनगर येथील पीएमजीपी इमारतीच्या पुनर्वसनाचा मुहूर्त ठरला डिसेंबर नंतर कामास सुरुवात
– खासदार रविंद्र वायकर व उपाध्यक्ष तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जयस्वाल यांच्यात पार पडलेल्या बैठीकीत निर्णय
– पीएमजीपीच्या रहिवाश्यांना ३ वर्षांचे भाडे एक रक्कमी मिळणार
– बैठकीत लोकसभा क्षेत्रातील एकूण ४० प्रलंबित विषयांवर झाली बैठक
– मेघवाडी सर्वोदयनगर प्रकरणात म्हाडा इंटरविन करणार
– मालाड खडकपाडा येथील प्लॉटचा विकास म्हाडा करणार
– समर्थनगर येथील ट्रांझिट कॅम्प पाडून पुन्हा ट्रांझिट कॅम्प बांधणार
– बिंबिसार येथील १ ते १७ ट्रांझिट कॅम्पचा पुनर्विकास करण्यास म्हाडाची तयारी
– वनराई कॉलनीच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव शासनास सादर. सुरुवातीला ४ ते २१ इमारतींचा पुनर्विकास करणार
– आराम नगर येथील म्हाडाच्या इमारतींचा पुनर्विकास करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता
*मुंबई :*
गेली अनेक वर्ष रखडलेल्या अंधेरी (पूर्व) येथील पीएमजीपीच्या १७ अति धोकादायक इमारतींच्या पुनर्वसनाचा मुहूर्त निश्चित करण्यात आला. २७ मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर तसेच म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्यात पार पडलेल्या बैठकीत येत्या डिसेंबर नंतर पुनर्वसनाच्या कामास सुरुवात करण्याचा तसेच रहिवाश्यांना तीन वर्षांचे भाडे एकत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नाबाबत खासदार वायकर यांनी उपाध्यक्ष तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समवेत बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला मुंबई बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, सह मुख्याधिकारी वंदना सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता राठोड, कार्यकारी अभियंता विहार बोडके आदी अधिकारी विभागप्रमुख तसेच माजी नगरसेवक स्वप्नील टेंबवलकर, राजू पेडणेकर, सदानंद परब. संजय पवार, राजुल पटेल, प्रतिमा खोपडे, लोचना चव्हाण आदी पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

पूनम नगर पीएमजीपी येथील रहिवाश्यांसाठी खरेदी विक्रीची कनेक्टिविटीचा विशेष कॅम्प लावण्यात येणार आहे. सोमवारपासून हा कॅम्प लावण्यात येणार आहे. येथील सदनिका खरेदी केलेल्या व्यक्तीचे निधन झाले असेल त्यांच्या वारसदारांकडून सक्सेशन प्रमाणपत्र प्राप्त होत नाही तोपर्यत मृत व्यक्तीच्या नावे खोली राखीव ठेवण्यात येईल. कुटुंबांनी मान्यता दिल्यावर भाड्याची वाटणी समान करण्यात येईल. यासर्व कामांसाठी एक समन्वय समिती गठीत करण्यात येणार. या समितीची बैठक महिन्यातून एकदा घेण्यात येणार. पुनर्विकासाचे काम सुरु करण्यापूर्वी फेडरेशन यांच्या समवेत एक बैठक म्हाडाने घ्यावी, अशी विनंती रहिवाश्यांकडून यावेळी करण्यात आली.

*मेघवाडी सर्वोदय नगर प्रकल्प :*
हे प्रकरण एन.सी.एल.टी मध्ये प्रलंबित असल्याने हा प्रश्न सोडवण्यासाठी म्हाडाचे उपाध्यक्ष यांनी स्वतः पुढील आठवड्यात बैठक घेण्याचे आश्वासन दिले असून ह्याचा विकास म्हाडातर्फे करण्यासाठी निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.
चाळ नंबर १ ते ५५ एम.एच.बी.कॉलोनी, सर्वोदय नगर येथील म्हाडाच्या बैठ्या चाळीतील खोल्यांचे मार्च २०२५ पर्यंतचे पाण्याचे तसेच इतर कर मुंबई महानगरपालिकेकडे भरण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
म्हाडा कॉलनी, अंधेरी (पूर्व) येथील कोकण नगर जवळील म्हाडाच्या भूखंडावर विकासकाकडून करण्यात येणारे अतिक्रमण रोखण्यासाठी याठिकाणी तात्काळ संरक्षण भिंत बांधण्याच्या सुचना म्हाडाचे उपाध्यक्ष यांनी संबंधित अधिकारी यांना दिल्या. हा प्लॉट पोलीसांसाठी राखीव असल्याने या ठिकाणी पोलिस स्टेशन व पोलिस वसाहत बांधण्याचा म्हाडाचा विचार आहे. दिंडोशी खडकपाडा येथील म्हाडाच्या प्लॉट वरील झोपड्यांचे परीशिष्ट-२ तयार करण्याचे काम म्हाडामार्फत करण्यात येत आहे. म्हाडाने हा प्लॉटचा विकास करावा अशी येथील रहिवाश्यांची मागणी असल्याने, म्हाडाने या प्लॉटचा विकास करण्याची तयारी दर्शवली आहे. याबाबत संपूर्ण माहिती घेऊन निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन उपाध्यक्ष यांनी दिले. कोकणनगर येथील पोलीस वसाहतींचा हि पुनर्विकास करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

*इंदिरा नगर प्रकल्प :*
इंदिरा नगर येथील अपात्र झोपडीधारकांची पात्रता निश्चित करण्यात न आल्याने येथील विकास नियोजन आराखड्यात दाखवण्यात आलेला रस्ता बांधण्यात आलेला नाही. हा डीपी रस्ता मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरित करण्यात आलेला आहे. जोपर्यंत अपात्र झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्यात येत नाही तोपर्यंत येथील डीपीमधील रस्ता बनवणे शक्य होणार नसल्याचे यावेळी निदर्शनास आणण्यात आले. साद्यास्थित्त पुराव्याच्या आधारे अपात्र झोपडीधारकांच्या पात्रतेबाबत निर्णय घेण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
*समर्थ नगर ट्रांझिट कॅम्प प्रश्न :*
येथील ट्रांझिट कॅम्प पाडून नवीन बांधण्यात येणार असून २०१९ मध्ये शासनाने परिपत्रकहि काढले आहे. यात अ, ब व क अशी विभागणी करण्यात येणार असून नव्याने ट्रांझिट कॅम्प बांधून झाल्यावर रहिवाश्यांना घरे देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
*बिंबीसार नगर :*
बिबिसार नगर वाणिज्य संकुल येथील व्यायाम शाळा स्थानिक रहिवाशी यांना वापरासाठी देण्यात यावी, अशी सुचना खासदार वायकर यांनी यावेळी म्हाडाच्या अधिकारी यांना केली ती मान्य करण्यात आली. येथील ट्रांझिट कॅम्पचा पुनर्विकास टप्याटप्याने म्हाडा करणार असल्याची माहिती उपाध्यक्ष यांनी दिली. वनराई येथील इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव विकासक चांडक यांनी शासनाला सादर केला आहे असे सांगण्यात आले. येथील इमारत क्रमांक ४ ते २१ चा पुनर्विकास करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
अंधेरी (पश्चिम) वर्सोवा येथील एस.व्ही.पी नगर, विभाग क्रमांक ६८ म्हाडाच्या घरातील अनधिकृत बांधकाम करून लॉजची उभारणी:
येथील जागा एकूण ७ एकर आहे. म्हाडातर्फे येथील १७ बंगल्यावर तोडक कारवाई करण्यात आली असून ३३ (९) अंतर्गत येथील बंगल्याच्या पुनर्विकासासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. लवकरच या कामास सुरुवात करण्यात येणार आहे.

*आराम नगर, वर्सोवा :*
आराम नगर १ व २ या वसाहतीच्या पुनर्विकासाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली असून विकासकास ऑफर लेटर देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. सुघम आणि सिह या प्रकल्पाची संपूर्ण माहिती देण्यात यावी अशी माहिती उपाध्यक्ष यांनी दिली. पोलिसानाही हक्काची घरे देण्यात यावी अशी मागणी पोलीस पत्नी यांनी म्हाडाच्या अधिकारी यांच्याकडे केली. ओशिवरा येथील सिटींएस क्रमांक ६५१ चा संपूर्ण स्टेट्स रिपोर्ट देण्याचे निर्देश म्हाडाचे उपाध्यक्ष यांनी संबंधित अधिकारी यांना दिले.
*त्रीचरण सप्तकार सह.गृहनिर्माण संस्था :*
याप्रश्नी एमएमआरडीए, एस.आर.ए व म्हाडा यांची संयुक्त बैठक लवकरच घेण्यात येईल, असे आश्वासन उपाध्यक्ष यांनी यावेळी दिले.




