आमची मुंबईमनोरंजनमहाराष्ट्रमुंबईशैक्षणिकसंपादकीयसामाजिक

निवृत्त कर्मचाऱ्यांच्या, ‘लेखक वाचक मित्र मैत्रिणींचा समूह’ या whats app समूहाच्या ‘ मिस’ या तिसऱ्या दिवाळी अंकाचे प्रकाशन

सर्वद फाऊंडेशनच्या संचालिका, साहित्यिक, संगीत विशारद, वास्तु विशारद, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सुचिता पाटील यांच्या हस्ते झाले

मुंबई- रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई, येथील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या, ‘लेखक वाचक मित्र मैत्रिणींचा समूह’ या whats app समूहाच्या ‘ मिस’ या तिसऱ्या दिवाळी अंकाचे प्रकाशन गुरुवार, दिनांक 9 ऑक्टोबर 2025 रोजी ठाण्यातील ऋतु पार्क क्लब हाऊस येथे एका दिमाखदार सोहोळ्यात, सर्वद फाऊंडेशनच्या संचालिका, साहित्यिक, संगीत विशारद, वास्तु विशारद, सामाजिक कार्यकर्त्या, पत्रकार अशा विविध क्षेत्रांत नैपुण्य प्राप्त केलेल्या उच्चविद्याविभुषित डॉ. सुचिता पाटील यांच्या हस्ते झाले.

रिझर्व्ह बँकेतील निवृत्त कर्मचाऱ्यांचा हा लेखक वाचक समूह, 5 सदस्य इतक्या लहान संख्येपासून अडीच वर्षांपूर्वी स्थापन झाला. आज या समूहाची सदस्य संख्या 120 आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत प्रसिद्ध झालेले तीन दिवाळी अंक आणि एक स्वातंत्र्य दिन विशेषांक यातील लेखन समूहातील सदस्यांनीच केले आहे. शिवाय pdf स्वरूपात प्रकाशित झालेल्या काही अंकातील लेखनही समूह सदस्यांचेच आहे. अशा या वैशिष्ट्यपूर्ण अंकाचे प्रकाशन डॉ. सुचिता पाटील या सुयोग्य व्यक्तीच्या हस्ते होणं हा एक आनंददायी योग होता.

 

त्यांच्या भाषणात सर्वद फाऊंडेशनचे अनेक स्तुत्य उपक्रम त्यांनी विशद केले. आरोग्य, शिक्षण, सामाजिक प्रश्नांवर समुपदेशन, रोजगारनिर्मिती, आदिवासींचा विकास अशा अनेकविध उपक्रमांत सर्वद फाऊंडेशनचे महत्वाचे योगदान आहे.

 

याच कार्यक्रमांतर्गत ‘लेखक आपल्या भेटीला’ या कार्यक्रमात स्त्री मुक्ती संघटनेच्या सचिव अमोल केरकर यांनी, ग्रंथाली तर्फे हल्लीच प्रकाशित झालेल्या त्यांच्या ‘जगातून फेरफटका – एक मागोवा’ या पुस्तकाचा परिचय करून दिला.

 

उत्तम वक्ते आणि सजग, रसिक प्रेक्षक यांच्यामुळे संपन्न झालेल्या या सुरेख कार्यक्रमाची सांगता समूहातीलच गायक गायिकांनी गायलेल्या सुरेल ‘संगीत संध्या’ या कार्यक्रमाने झाली.

 

श्रोत्यांच्या विनंतीनुसार ‘झाल्या तिन्ही सांजा’ या गीताचं एक कडवं गाऊन डॉ सुचिता पाटील यांनी संगीत विशारद असल्याची चुणूक दाखवून दिली. समूह गायक-गायिकांची आणखी पाच ते सहा गाणी वेळेअभावी घेता आली नाहीत.

 

समूह आयोजक संदीप देशपांडे यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्र-संचलन केले. सौ मंजुषा गोसावी, कार्यकारी संपादक, मिस दिवाळी 2025 अंक, यांनी मनोगत व्यक्त करताना आपल्या अनुभवी शब्दांची शिदोरीच जणू काही श्रोत्यांना दिली. संपादक विष्णु यादव यांनी सर्व उपस्थितांचे तसेच डॉ सुचिता पाटील यांचे विशेष आभार मानले.

 

पाच वाजता सुरू झालेला हा कार्यक्रम आठ साडेआठ वाजले तरीही श्रोत्यांना पुढेही सुरू रहावा असे वाटत होते. यातच कार्यक्रमाचे यश सामावले आहे.

 

सर्वात महत्वाचे म्हणजे डॉ सुचिता पाटील ह्या शेवटपर्यंत उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेत होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button