आमची मुंबईगोरेगांव पूर्वमहाराष्ट्रमुंबईमुंबई चे रस्तेविशेषसामाजिक

माजी नगरसेविका प्रीती सातम उतरल्या रस्त्यावर सामान्य नागरिकांना वेठीस धरणाऱ्या फेरीवाल्यांवर केली कारवाई

रस्त्यावरचा फूटपाथचा अडथळा हटवला तर मोकळा श्वास घेत चालता येईल - प्रिती सातम (माजी नगरसेविका)

माजी नगरसेविका प्रीती सातम उतरल्या रस्त्यावर सामान्य नागरिकांना वेठीस धरणाऱ्या फेरीवाल्यांवर केली कारवाई

 

रस्त्यावरचा फूटपाथचा अडथळा हटवला तर मोकळा श्वास घेत चालता येईल – प्रिती सातम (माजी नगरसेविका)

मुंबई – माजी नगरसेविका प्रिती सातम प्रतिनिधित्व करत असलेल्या गोकुळधाम येथील कृष्णवाटिका रस्त्यावर, पदपथावर मोठ्या झालेले अतिक्रमण हे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतुकीसाठी मोठा अडथळा ठरत होते. यामुळे नागरिकांना चालण्यासाठी आणि वाहनांना मार्गक्रमण करण्यासाठी जागाच उरली नव्हती.

या अतिक्रमणास तात्काळ हटवण्यासाठी माजी नगरसेविका प्रिती सातम यांनी स्वतः रस्त्यावर उतरून महानगरपालिका अधिकाऱ्यांसोबत उपस्थित राहून अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केली.

 

कारवाई दरम्यान परिसरातील नागरिकही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

नागरिकांच्या सोयीसाठी आणि रस्त्यावरील शिस्त टिकवण्यासाठी अशा अनधिकृत अतिक्रमणा विरोधात आणखी कठोर पावले उचलली जातील असे आश्वासन प्रिती सातम यांनी दिले

MyBmc Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार BJP Mumbai Ameet Satam

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button