आमची मुंबईमहाराष्ट्रमुंबईविशेषसामाजिक

खासदार क्रीडा महोत्सव-२०२५” चे खासदार रविंद्र वायकर यांच्या हस्ते पार पडले भव्य उद्घाटन*

सिनेअभिनेता टायगर श्रॉफ याने लावली उपस्थिती

*मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा*

*“खासदार क्रीडा महोत्सव-२०२५” चे खासदार रविंद्र वायकर यांच्या हस्ते पार पडले भव्य उद्घाटन*

 

– सिनेअभिनेता टायगर श्रॉफ याने लावली उपस्थिती

– सुमारे ३५०० क्रीडा प्रेमी उद्घाटन सोहळ्यास उपस्थित

– ⁠उपस्थितांनी घेतली क्रीडा शपथ

 

*मुंबई:*

 

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील खासदार यांना केलेल्या सूचनेनुसार मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांनी आयोजित केलेल्या भव्य ‘खासदार क्रीडा महोत्सव-२०२५’ या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन खासदार रविंद्र वायकर यांच्या हस्ते दिमाखदार सोहळ्यात अंधेरी पश्चिम येथील शहाजी राजे भोसले क्रीडा संकुल येथे करण्यात आले. यावेळी ३५०० क्रीडाप्रेमी उपस्थित होते. यावेळी जिमन्यास्टिकच्या माध्यमातून क्रीडा महोत्सवात आयोजित विविध खेळ प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून दाखवण्यात आले.

खासदार क्रीडा महोत्सव-२०२५ च्या टी-शर्ट चे अनावरणही करण्यात आले. या महोत्सवाला स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे सहाय्यक संचालक अंकित पाटील, विभाग प्रमुख अल्ताफ पेवेकर, ज्ञानेश्वर सावंत, राजू पेडणेकर, स्वप्नील टेंबवलकर, सुभाषकांता सावंत, प्रियांका पेडणेकर, लोचना चव्हाण, रचना सावंत, मनीषा वायकर, माजी नगरसेविका राजुल पटेल, साधना माने, विष्णू सावंत, सदानंद परब, प्रवीण शिंदे, प्रतिमा खोपडे, इसाक मकवाना, आत्माराम चाचे, संजय पवार, दीप्ती अमेय वायकर-पोतनीस, प्राजक्ता राहुलकुमार वायकर-महाले, डॉ. अमेय पोतनीस, डॉ. राहूलकुमार महाले, डॉ. पोतनीस, डॉ. सावंत, शिवसेनेच्या विविध शाखांचे शाखा प्रमुख, महिला पदाधिकारी, शहाजी राजे भोसले क्रीडा संकुलाचे अधिकारी उपस्थित होते.

या उद्घाटन सोहळ्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या फुटबॉलच्या प्रेक्षणीय सामन्याला हिंदी चित्रपट क्षेत्रातील अभिनेता टाइगर श्रॉफ उपस्थित होते. त्यांचा ही सन्मान यावेळी करण्यात आला. क्रीडा संकुलात उपस्थितांनी घेतली क्रीडा शपथ.

१६ नोव्हेंबर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button