बेशुद्ध अवस्थेत सापडलेला इसम उपचारादरम्यान मृत; नातेवाईकांचा शोध सुरू
इसमाबाबत माहिती असल्यास किंवा नातेवाईक असल्यास, त्यांनी त्वरित बी.के.सी. पोलीस ठाणे, मुंबई येथे संपर्क साधावा

बेशुद्ध अवस्थेत सापडलेला इसम उपचारादरम्यान मृत; नातेवाईकांचा शोध सुरू
मुंबई : बीकेसी परिसरातील भारत नगर बस स्टॉप येथे 09 सप्टेंबर 2025 रोजी एक अनोळखी इसम बेशुद्ध अवस्थेत आढळला. माहिती मिळताच बी.के.सी. पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि सदर इसमास खाजगी ऍम्ब्युलन्सद्वारे सायन रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.

रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू असतानाच 11 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 4.30 वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची नोंद बी.के.सी. पोलीस ठाण्यात अपमृत्यू नोंद क्रमांक 37/2025 कलम 194 BNSS अंतर्गत करण्यात आली आहे.
मृत व्यक्तीचे वर्णन :
लिंग – पुरुष
बांधा – सडपातळ
चेहरा – उभाट
केस व दाढी – काळी-पांढरी मिश्रित
उंची – सुमारे 5 फूट 5 इंच
सदर मृत व्यक्तीचे नातेवाईक अद्याप ओळख पटलेले नाहीत. त्यामुळे कोणाला या इसमाबाबत माहिती असल्यास किंवा नातेवाईक असल्यास, त्यांनी त्वरित बी.के.सी. पोलीस ठाणे, मुंबई येथे संपर्क साधावा.
दूरध्वनी : 022-26504481 / 82



