आपली मुंबईआमची मुंबईमहाराष्ट्रराजकीय बातमीविशेषसामाजिक

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच इतिहास घडला! मुंबई महानगरपालिकेवर पहिल्यांदाच भाजपाचा भगवा फडकला 

मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमीत साटम यांच्या नेतृत्वात भाजपाचा ऐतिहासिक विजय

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच इतिहास घडला! मुंबई महानगरपालिकेवर पहिल्यांदाच भाजपाचा भगवा फडकला

 

मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमीत साटम यांच्या नेतृत्वात भाजपाचा ऐतिहासिक विजय

मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमीत साटम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पेढा भरवताना

स्वातंत्र्यानंतर प्रथमच मुंबई महानगरपालिकेवर भाजपाची सत्ता मुंबईच्या राजकारणात नवा अध्याय; भाजपाचा भगवा फडकला

नागेश कळसगौंडे (मुख्य संपादक) – मुंबई भाजपाचे अध्यक्ष अंधेरी पश्चिम विधानसभेची तोफ , यंग ,डैशिंग , डायनामिक अंधेरी पश्चिमचा बुलंद आवाज तेज तर्रार आमदार अमीत साटम यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या राजकारणात एक ऐतिहासिक पर्व सुरू झाले आहे. स्वातंत्र्यानंतर तब्बल अनेक दशकांनी प्रथमच मुंबई महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाचा भगवा फडकला असून, हा क्षण मुंबईच्या राजकीय इतिहासात मैलाचा दगड ठरला आहे.

महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका म्हणून जीची ओळख आहे व आशिया खंडात सर्वात श्रीमंत महानगर पालिका असलेल्या मुंबई महापालिकेवर पहिल्यांदाच भाजपचा भगवा फडकला आहे.

या विजयाने मुंबई महापालिकेच्या सत्ताकारणात मोठा बदल घडून आला आहे. आजवर विविध पक्षांच्या ताब्यात असलेल्या महापालिकेवर प्रथमच भाजपाने स्पष्ट व निर्णायक वर्चस्व मिळवत सत्ता स्थापन केली आहे. आमदार अमीत साटम यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली भाजपाने संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांची ताकद आणि विकासाचा अजेंडा जनतेसमोर प्रभावीपणे मांडत मतदारांचा विश्वास संपादन केला.

निवडणूक प्रचारादरम्यान मुंबईकरांच्या मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत पायाभूत सुविधा, स्वच्छता, वाहतूक, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा आणि पारदर्शक प्रशासन यावर भर देण्यात आला होता. या मुद्द्यांना मुंबईकरांनी भरभरून प्रतिसाद दिला असून, त्याचेच प्रतिबिंब या ऐतिहासिक निकालातून दिसून आले आहे.

विजयानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला. आमदार अमीत साटम यांनी या विजयाचे श्रेय मुंबईकर जनतेला आणि अहोरात्र मेहनत घेतलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिले आहे. “मुंबईकरांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास आम्ही विकासकामांच्या माध्यमातून सार्थ ठरवू. पारदर्शक, उत्तरदायी आणि विकासाभिमुख प्रशासन देणे हीच आमची प्राथमिकता असेल,” असे त्यांनी सांगितले.

भारतीय जनता पक्षाने ८९ जागांवर विजय मिळवला तर शिवसेना शिंदे गट यांनाही २९ जागांवर विजय मिळवला आहे असून आता भाजपचा महापौर मुंबई महानगर पालिका मध्ये बसण्याचे जवळपास निश्चित झाले आहे

या ऐतिहासिक यशामुळे मुंबई महानगरपालिकेच्या कारभारात नव्या युगाची सुरुवात झाली असून, येत्या काळात मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस निर्णय आणि जलद अंमलबजावणी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button