अंधेरी पश्चिम विधानसभाआपली मुंबईआमची मुंबईके पश्चिम विभागमहाराष्ट्रमुंबईराजकीय बातमीवर्सोवा विधानसभा

मुंबई महापालिकेत पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती! भाजपचे युवा उमेदवार रुपेश सावरकर यांच्या कडून दिग्गज बाळा आंबेरकरांचा पराभव

२०१७ मध्ये वॉर्ड क्रमांक ६८ मधून भाजपाचे युवा उमेदवार रोहन राठोड यांनी दिली होती धोबीपछाड

मुंबई – मुंबई महापालिकेत पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती झाली असून भाजपचे युवा उमेदवार रुपेश सावरकर यांच्या कडून दिग्गज बाळा आंबेरकरांचा पराभव मुंबई महानगर पालिका निवडणुकीत पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. भाजपाच्या युवा उमेदवारांनी दिग्गज नेत्यांना पराभवाची धूळ चारत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.

वॉर्ड क्रमांक ६३ मधून भाजपाचे युवा उमेदवार रुपेश सावरकर यांनी मुंबई महानगर पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, अनुभवी नगरसेवक बाळा आंबेरकर यांचा दणदणीत पराभव केला आहे. या निकालामुळे मुंबईच्या राजकारणात तरुण नेतृत्वाची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

विशेष म्हणजे, ही काही पहिलीच वेळ नाही. २०१७ च्या मुंबई महानगर पालिका निवडणुकीत देखील याच बाळा आंबेरकर यांना वॉर्ड क्रमांक ६८ मधून भाजपाचे युवा उमेदवार रोहन राठोड यांनी १९७४ मतांनी हरवत धोबीपछाड दिली होती.

सलग दोन निवडणुकांमध्ये युवा उमेदवारांकडून झालेल्या पराभवामुळे बाळा आंबेरकर यांच्या राजकीय वाटचालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, भाजपच्या युवा नेतृत्वाचा वाढता प्रभाव स्पष्टपणे दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button