युवा प्रतिष्ठान सुंदरबागचा राजा माघी गणपतीचे भव्य आगमन
पवित्र सोहळ्याचा शुभारंभ मंडळाचे प्रमुख सल्लागार तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या हस्ते संपन्न

युवा प्रतिष्ठान सुंदरबागचा राजा माघी गणपतीचे भव्य आगमन

कुर्ला पश्चिम येथील युवा प्रतिष्ठान, सुंदरबाग यांच्या वतीने माघी गणपतीच्या भव्य आगमनाचा सोहळा उत्साहात पार पडला. भक्तिमय वातावरणात ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात श्री गणरायाचे आगमन करण्यात आले. या पवित्र सोहळ्याचा शुभारंभ मंडळाचे प्रमुख सल्लागार तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी रियाझ मुल्ला, रत्नाकर शेट्टी, अजीज खान यांची विशेष उपस्थिती लाभली. मंडळाच्या कार्यकारिणीत अध्यक्ष शुभम कांबळे, खजिनदार दीपक गायकवाड, सेक्रेटरी समीर नाजरकर, उपाध्यक्ष अक्षय व्हटकर, उपखजिनदार महेश कचवे, उपसेक्रेटरी अनिरुद्ध पुजारी व रमेश कुरील यांचा समावेश आहे.
युवा प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि भक्तांसाठी विविध सेवा राबवण्यात येणार असून, माघी गणपती उत्सव शांतता, भक्ती आणि एकतेच्या वातावरणात साजरा केला जाणार आहे.



