आपली मुंबईमहाराष्ट्रमुंबईविशेष

पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या आरेत रॉयल पाम्स बिल्डरकडून सोडले जातेय खुलेआम तीस ते चाळीस बिल्डिंगचे सांडपाणी…

आरे चे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र पवार यांच्याकडून अद्याप कोणतीही कारवाई नाही

आरे फॉरेस्ट केवळ नावापुरतेच ?

पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या आरेत रॉयल पाम्स बिल्डरकडून सोडले जातेय खुलेआम तीस ते चाळीस बिल्डिंगचे सांडपाणी…

मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र पवार यांच्याकडून अद्याप कोणतीही कारवाई नाही

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे लक्ष देणार का?

आरे केवळ नावापुरतीच जंगल घोषित करण्यात आली आहे का ? असा प्रश्न पर्यावरण प्रेमींना पडला आहे.पर्यावरणाचा विचार करून आरे वसाहतीतील मेट्रो कार शेड ठाकरे सरकारकडून कांजूरमार्ग या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आली व आरे वसाहतीचा ८०८ एकरचा परिसर जंगल म्हणून घोषित करण्यात आला.दरम्यान या सर्व गोष्टी सुरू असतानाच दुसर्‍या बाजूस याच आरे दुग्ध वसाहतीत खाजगी बिल्डरकडून 30 ते 40 बिल्डींगचे सांडपाणी अनधिकृतपणे खुलेआम आरेच्या मोकळ्या जागेत सोडले जात असून त्याबाबत आरे प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर देखील अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही त्यामुळे पर्यावरण प्रेमींमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.विशेष म्हणजे या संकुलनात असलेल्या काही इमारतींना OC व CC देखील मिळाली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित असलेल्या आरेत रॉयल पाम्स या खाजगी बिल्डरकडून युनिट क्रमांक २९, मयूरनगर येथून मोठ्या प्रमाणात सांडपाणी सोडले जात असून त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तसेच पर्यावरणाचे देखील नुकसान होत आहे. याबाबत स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी (राणे समर्थक) दाऊद शेख यांनी आरे प्रशासनाकडे लेखी तक्रार केली आहे.परंतु अद्याप त्यांच्या तक्रार अर्जावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.उलट त्यांना तक्रार केल्यामुळे धमक्या मिळत आहेत तसेच सोशल मीडियावर त्यांची बिल्डरने पाळलेल्या गुंडामार्फत खोटी बदनामी केली जात असल्याची माहिती त्यांनी आम्हाला दिली.

दाऊद शेख यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना माहिती दिली की,”रॉयल पाम्स या खाजगी बिल्डरकडून खुलेआम पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या आरेत सांडपाणी सोडले जात आहे.याबाबत यापूर्वी दुग्धविकास आयुक्तांनी आरे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी आरे यांना कळविले होते.तसेच हे सांडपाणी बंद करण्याकरीता भिंत उभारण्यासाठी निधी देखील उपलब्ध करून दिला होता.परंतु येथील अधिकाऱ्यांनी या बिल्डर सोबत फरजिवाडा करून हा निधी आपल्या खिशात टाकला.तसेच बिल्डरने पोसलेले काही गावगुंड तक्रार करणाऱ्यांना धमक्या देऊन त्रास देण्याचे काम करत आहेत.तक्रार करणार्‍यांच्या गाड्या फोडल्या जात आहेत.त्यांना पेट्रोल टाकून खुलेआम पेटवून देण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.तक्रार केल्यामुळे माझी सोशल मीडियावर खोटी बदनामी केली जात आहे.या सर्व गोष्टींबाबत आरे पोलीस प्रशासन व दुग्ध खात्याकडे लेखी तक्रार करून देखील अध्याप बिल्डरने पाळलेल्या ह्या गाव गुंडांवर कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे याबाबत मी आमचे मार्गदर्शक आमदार नितेश नारायण राणे यांची लवकरच भेट घेणार असून येत्या हिवाळी अधिवेशनात या प्रश्नांवर आवाज उठविण्याची विनंती करणार आहे.तसेच मी या बिल्डर व त्यांनी पाळलेल्या लुख्या गुंडांच्या विरोधात आवाज उठवल्यामुळे अनेक सामाजिक संस्था,पत्रकार,पर्यावरण प्रेमी यांनी मला जाहीर पाठिंबा दिला असून ते देखील माझ्या आंदोलनात सामील होणार आहेत.”अशी माहिती देखील दाऊद शेख यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button