महानगरपालिकेचा प्रसिद्ध ‘फ्लॉवर शो’ यंदा प्रथमच मुंबई उपनगरात, जुहू येथील पुष्पा नरसी पार्क मध्ये पहिल्यांदाच झाले आयोजन
महोत्सवाचे उद्घाटन जागतिक कीर्तीचे अभिनेते पद्मश्री अक्षय कुमार यांच्या हस्ते उत्साहात संपन्न

मुंबई – महानगरपालिकेचा प्रसिद्ध ‘फ्लॉवर शो’ यंदा प्रथमच मुंबई उपनगरात, जुहू येथील पुष्पा नरसी पार्क येथे महोत्सवाचे उद्घाटन जागतिक कीर्तीचे अभिनेते पद्मश्री अक्षय कुमार यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. याप्रसंगी मुंबई भाजपा अध्यक्ष अंधेरी पश्चिम विधानसभा आमदार अमीत साटम, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, उपायुक्त भाग्यश्री कापसे, वॉर्ड ऑफिसर चक्रपाणी अल्ले आणि उद्यान अधीक्षक जितेन्द्र परदेशी यांच्यासह पालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच प्रसिद्ध दिग्दर्शक श्री अशोक पंडित, नगरसेवक श्री अनिष मकवानी, नगरसेवक श्री दीपक कोतेकर, नगरसेवक श्री रोहन राठोड, नगरसेवक श्री विठ्ठल बंधेरी, नगरसेविका श्री सुनीता मेहता, नगरसेविका सौ. सुधा सिंग, नगरसेविका कु. सायली कुलकर्णी, शालेय विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा’ या मोहिमेअंतर्गत श्री अक्षय कुमार यांनी स्वच्छ मुंबई स्पर्धा आयोजित करण्याबाबत सूचना केली होती. ती सूचना महानगरपालिकेने स्वीकारली असून, येत्या काळात मुंबईकरांच्या सहभागासह स्वच्छतेची स्पर्धा मुंबई शहरात आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेचे मूल्यांकन थर्ड पार्टी एजन्सीमार्फत करण्यात येईल आणि लवकरच संबंधित एजन्सीची नियुक्ती मुंबई महानगरपालिका करणार आहे.

या स्पर्धेला श्री अक्षय कुमार यांनी ‘मुंबई क्लीन लीग’ असे नाव देण्याची सूचना केली असून येत्या काळात या मोहिमेचे नेतृत्व त्यांनी करावे अशी सूचना मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी केली. या उपक्रमाच्या माध्यमातून मुंबई शहर अधिक स्वच्छ करण्याच्या दृष्टीने मुंबईकरांचा सक्रिय सहभाग वाढेल आणि ‘स्वच्छ भारत’ अभियानातील मुंबईचे रँकिंग उंचावण्यासाठीही याचा निश्चितच उपयोग होईल असे देखील ते पुढे म्हणाले.

या फ्लॉवर शोमध्ये विविध प्रकारची फुलझाडे, वनस्पती तसेच भाज्यांची रोपे प्रदर्शित करण्यात आली होती. येथे साकारलेली शंकराची पिंडी, हत्ती आणि मोर ही आकर्षक फुलरचना या फ्लॉवर शोचे खास आकर्षण ठरली.




