‘होली स्पिरिट’मध्ये आर्थिक अनियमितता अँड भीमेश मुतुला यांच्या तक्रारी नंतर रुग्णालयाला दणका
रुग्णास ४ लाख रुपये परत करण्याचे निर्देश; देखरेख समितीचा निर्णय

‘होली स्पिरिट’मध्ये आर्थिक अनियमितता अँड भीमेश मुतेला यांच्या तक्रारी नंतर रुग्णालयाला दणका
रुग्णास ४ लाख रुपये परत करण्याचे निर्देश; देखरेख समितीचा निर्णय
मुंबई, दि. — अंधेरी येथील नामांकित होली स्पिरिट रुग्णालयात आर्थिक अनियमिततेचा प्रकार उघडकीस आला असून, संबंधित रुग्णास तब्बल ४ लाख ०३ हजार ४२२ रुपये परत करण्याचे निर्देश धर्मादाय आयुक्तांच्या देखरेख समितीने दिले आहेत.

गरजू रुग्ण अज़ाद जाधव यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. आयपीएफ (इंडिजेंट पेशंट फंड) योजनेअंतर्गत पात्र रुग्णांना मोफत किंवा सवलतीत उपचार देणे बंधनकारक असतानाही अतिरिक्त बिल आकारणे आणि तक्रारींकडे दुर्लक्ष करणे यासारख्या गंभीर बाबी समितीच्या निदर्शनास आल्या.
तपास अहवालानुसार, धर्मादाय रुग्णालयांनी योजनेनुसार १० टक्के खाटा आणि १० टक्के निधी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. मात्र संबंधित प्रकरणात पारदर्शकतेचा अभाव आढळल्याचे नमूद करण्यात आले.

नोंदवत अँड भीमेश मुतेला यांनी केलेल्या स्वतंत्र विशेष लेखापरीक्षणाच्या मागणीला समितीने मान्यता दिली असून, रुग्णालयाचे विशेष लेखापरीक्षण करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच संबंधित रक्कम ३० मार्च २०२६ पूर्वी परत करून अनुपालन अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे गरजू रुग्णांना न्याय मिळाल्याचा संदेश समाजात गेला असून, धर्मादाय रुग्णालयांनी शासनाच्या योजनांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे. आयपीएफ योजनेचा उद्देश दुर्बल घटकांतील रुग्णांना मोफत किंवा सवलतीत उपचार उपलब्ध करून देणे हा आहे. काही नामांकित रुग्णालयांकडून योजनेचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी वाढत असल्याने अशा प्रकरणांवर कठोर कारवाईची गरज असल्याचेही मत व्यक्त करण्यात आले.

देखरेख समितीने भविष्यात पात्र रुग्णांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारू नये, अशा कडक सूचना देत नियमांचे पालन करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.



