मुंबईतील काँक्रिटीकरण कामांना वेग; ६३% कामे पूर्ण
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मुंबई महानगरात सुरू असलेल्या काँक्रिटीकरण कामांचा सविस्तर आढावा घेतला.

मुंबईतील काँक्रिटीकरण कामांना वेग; ६३% कामे पूर्ण
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मुंबई महानगरात सुरू असलेल्या काँक्रिटीकरण कामांचा सविस्तर आढावा घेतला.

काँक्रिटीकरण टप्पा १ अंतर्गत निर्धारित उद्दिष्टांपैकी तब्बल ७७ टक्के कामे पूर्ण झाली असून टप्पा २ अंतर्गत ५२ टक्के कामे पूर्णत्वास गेली आहेत. एकूण मिळून आतापर्यंत ६३ टक्के कामे यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली.
आयुक्तांनी स्पष्ट निर्देश दिले की, पुढील कालावधीत रस्तेनिहाय सूक्ष्म नियोजन करून खोदण्यात आलेले रस्ते निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावेत. तसेच काँक्रिटीकरण कामांबाबत लोकप्रतिनिधींशी सातत्याने संवाद साधून त्यांना इत्यंभूत माहिती द्यावी आणि त्यांचा प्रतिसाद घ्यावा.

अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी कामाच्या गुणवत्तेबाबत विशेष सूचना दिल्या. रस्त्याच्या ‘बेस लेवल’पासून प्रत्येक घटकस्तरात मानकांनुसार Aggregates, Moisture, Temperature यांसारखे तांत्रिक निकष काटेकोरपणे पाळणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. सध्या पावसाळ्यापूर्वी ७५ दिवसांचा कालावधी उपलब्ध असून या काळात सूक्ष्म नियोजन केल्यास प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा गाठता येईल, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीस उपआयुक्त (पायाभूत सुविधा) गिरीश निकम, प्रमुख अभियंता (रस्ते) मंतय्या



