आमची मुंबईमहाराष्ट्रमुंबईविशेषसंपादकीयसामाजिक

गटाई कामगारांना संरक्षण द्या; कारवाई थांबवा — महानगरपालिका आयुक्त व विरोधी पक्षनेत्या यांच्याकडे निवेदन

राष्ट्रीय चर्मकार संघाचे संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार बाबुरावजी माने, प्रदेश कार्याध्यक्ष राजेशजी खाडे यांनी घेतली भेट

गटाई कामगारांना संरक्षण द्या; कारवाई थांबवा — महानगरपालिका आयुक्त व विरोधी पक्षनेत्या यांच्याकडे निवेदन

मुंबई : समाजातील विविध प्रश्नांवर चर्चा करताना गटाई कामगार हे हॉकर्स नसून तातडीच्या सेवा देणारे महत्त्वाचे घटक आहेत, यावर ठाम भूमिका मांडण्यात आली. गटाई कामगारांवर कोणत्याही प्रकारची दंडात्मक कारवाई करू नये तसेच रेल्वेपासून ५०० मीटर परिसरात त्यांना संरक्षण देण्यात यावे, अशी ठोस मागणी करण्यात आली. त्यांच्या उपजीविकेचा व पोटापाण्याचा प्रश्न लक्षात घेऊन महानगरपालिकेने अन्यायकारक किंवा आक्षेपार्ह कारवाई टाळावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.

या संदर्भात प्रतिनिधी मंडळाने माननीय मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. गगराणी साहेब यांची भेट घेऊन समाजाच्या समस्या व मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली. त्यानंतर विरोधी पक्षनेत्या सौ. किशोरीताई पेडणेकर यांचीही भेट घेऊन विषय मांडण्यात आला. त्यांनी या विषयावर सकारात्मक प्रतिसाद देत पत्राद्वारे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.व येत्या काही दिवसात मुंबई महापौर व उपमहापौर यांचीही भेट घेऊन सदर विषय मार्गी लावण्याचा पर्यन्त करणार आहेत

या वेळी राष्ट्रीय चर्मकार संघाचे संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार बाबुरावजी माने, प्रदेश कार्याध्यक्ष राजेशजी खाडे, राम कदमजी, मुंबई अध्यक्ष विलास गोरेगावकरजी, मुंबई सरचिटणीस गणेश खिलारेजी तसेच मोठ्या संख्येने चर्मकार बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button