आमची मुंबईदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईविशेषसामाजिक

संकटात सेवेची प्रेरणादायी मिसाल : मारवाडी युवा मंच दुबईतर्फे १५६ भारतीयांना चार्टर्ड फ्लाइटने सुरक्षित भारतात आणले

मुंबईत आगमन झाल्यानंतर या सर्व समाजबांधवांचे स्वागत माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनील जैन खाबिया यांच्या नेतृत्वाखाली मारवाडी युवा मंच, मुंबई शाखेतर्फे स्वागत करण्यात आले.

संकटात सेवेची प्रेरणादायी मिसाल : मारवाडी युवा मंच दुबईतर्फे १५६ भारतीयांना चार्टर्ड फ्लाइटने सुरक्षित भारतात आणले

मुंबई : मध्य आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक भारतीय, विशेषतः मारवाडी समाजातील नागरिक तेथे अडकले होते आणि हवाई सेवा देखील विस्कळीत झाल्या होत्या. अशा कठीण परिस्थितीत अखिल भारतीय मारवाडी युवा मंचाच्या दुबई शाखेने सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण घालून दिले.

दुबई शाखेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे चार्टर्ड फ्लाइटची व्यवस्था करण्यात आली आणि तब्बल १५६ समाजबांधवांना सुरक्षितपणे भारतात परत आणण्यात आले. संकटाच्या या काळात ही मदत केवळ सहाय्य नव्हे, तर समाजाप्रती असलेले कर्तव्य, एकजूट आणि मानवतेची खरी भावना दर्शवणारी ठरली.

या उल्लेखनीय कार्यासाठी दुबई शाखेतील हिमांशुजी, रविंद्रजी तसेच संपूर्ण मारवाडी युवा मंच दुबई टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मुंबईत आगमन झाल्यानंतर या सर्व समाजबांधवांचे स्वागत माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनील जैन खाबिया यांच्या नेतृत्वाखाली मारवाडी युवा मंच, मुंबई शाखेतर्फे करण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेत श्री. खाबिया यांनी समन्वय साधत अडकलेल्या समाजबांधवांना मदत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

यावेळी माजी प्रांतीय उपाध्यक्ष प्रदीप शर्मा, प्रांतीय उपाध्यक्ष अमित मल्लावत तसेच मायूम मुंबईचे अध्यक्ष कपिल कर्णावट उपस्थित होते.

या प्रेरणादायी सेवाकार्यात मार्गदर्शन व मोलाचे योगदान देणाऱ्यांमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश जैन, माजी राष्ट्रीय अध्यक्ष रवी अग्रवाल, आंतरराष्ट्रीय संयोजक उमेश गर्ग तसेच आंतरराष्ट्रीय फोरमचे उपाध्यक्ष हेमंत शाह यांचा विशेष सहभाग होता.

या सेवाभावी उपक्रमामुळे संपूर्ण मारवाडी समाजात अभिमानाची भावना निर्माण झाली असून समाजातील एकजूट, सेवा आणि सहकार्याची परंपरा अधिक बळकट झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button