गुन्हेगोरेगांव पूर्वमहाराष्ट्रविशेषसामाजिक

मुंबई हादरली! लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज ओव्हरडोसने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू

पोलिसांनी तत्काळ कारवाई करत ड्रग्ज पुरवठा आणि आयोजनाशी संबंधित ५ जणांना केले अटक

मुंबई हादरली! लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज ओव्हरडोसने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू

मुंबईत पुन्हा एकदा धक्कादायक घटना समोर आली आहे. गोरेगाव परिसरातील नेस्को संकुलात आयोजित लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टदरम्यान ड्रग्जच्या ओव्हरडोसने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून युवकांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री नेस्को संकुलात मोठ्या प्रमाणात तरुण-तरुणी कॉन्सर्टसाठी जमले होते. या कार्यक्रमादरम्यान काही जणांनी ड्रग्जचे सेवन केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर दोन विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत ड्रग्ज पुरवठा आणि आयोजनाशी संबंधित ५ जणांना अटक केली आहे. तसेच या घटनेत आणखी काही जणांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात असून तपास सुरू आहे.

दरम्यान, या घटनेत काही अन्य तरुणांची प्रकृतीही गंभीर असल्याची माहिती असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे पालकवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलीस प्रशासनाने युवकांना अशा कार्यक्रमांमध्ये सतर्क राहण्याचे आवाहन केले असून ड्रग्जविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button