आमची मुंबईमनोरंजनमहाराष्ट्रविशेषसामाजिक

राजेश खर्डे वेसावकर यांना शिव रत्न भूषण पुरस्कार 2026 सुप्रसिद्ध पार्शगायक श्री अवधूत गुप्ते यांच्या हस्ते प्रदान

कोळी समाज भूषण आजचा पुरस्कार माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार - राजेश खर्डे वेसावकर

मुंबई – 12 एप्रिल संध्या. 6 वाजता अलिबाग येथील पीएनपी नाट्यगृह येथे शिवप्रेमी सामाजिक संस्था लोणारे अलिबाग यांच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष सुप्रसिद्ध गायक रोहित जी पाटील व सुप्रसिद्ध पार्श्वगायक संगीतकार श्री अवधूत जी गुप्ते यांच्या शुभहस्ते राजेश खर्डे वेसावकर यांना शिवरत्न भूषण पुरस्कार 2026 देण्यात आला यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.

गेली तीस-पस्तीस वर्ष कलागुणांची जोडलेले राजेश खर्डे वेसावकर अनेक शाळा अनेक कॉलेज आणि अनेक कंपन्या यामध्ये नृत्य दिग्दर्शक करून संपूर्ण भारताचे लोक नृत्य  या सर्व संस्थांना नृत्य निर्देशक केले आहे. तसेच अभिनेता गीतकार दिग्दर्शक बऱ्याच व्हिडिओमध्ये काम राजेश खर्डे वेसावकर यांनी केले आहे वेसावची पारू,परंपरा वेसावकरांची, टिपा आर्केस्ट्रा गंध मराठी मातीचा असे बरेच बॅनर रंगमंचावर कार्यरत आहेत तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा त्यांच्या मिसेस ओबामा या जेव्हा मुंबई दौऱ्यावर आल्या होत्या तेव्हा मी हाय कोळी या नृत्यावर डान्स करताना आपण बघितला असेल त्याचे नृत्य दिग्दर्शक देखील राजेश खर्डे वेसावकर यांनी  केले होते तसेच मातोश्रीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवस दरवर्षी कार्यक्रम सादर करत असतात .

वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व अमृता फडवणीस यांनी जे रिव्हर गाणं केलं होतं त्याचे नृत्यदिग्दर्शक व संपूर्ण परंपरा वेसावकरांची कलाकार सोबत वर्षा बंगल्यावर चित्रीकरण केले. संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानामध्ये आपल्या कलाकारांनी कोळी समाजाचे नृत्य घेऊन गेलो महाराष्ट्र शासन मत्स्य विभाग व इंडियन कोस्ट गार्ड यांचे कारण दरवर्षीप्रमाणे करतो गेली वीस वर्ष फेस्टिवल मध्ये सतत कार्यक्रम करत असतात.

वेसावा फेस्टिवल सुरत फेस्टिवल आमदाबाद फेस्टिवल जुहू फेस्टिवल ट्रॉम्बे फेस्टिवल उलवे नवी मुंबई फेस्टिवल असे अनेक फेस्टिवल राजेश खर्डे करत असतात म्हणूनच  त्यांना फेस्टिवलचा बादशाह असही लोकं म्हणतात. आज पर्यंत राजेश खर्डे वेसावकर यांना असंख्य पुरस्कार भेटले त्यातले काही पुरस्कार कोळी नटसम्राट पुरस्कार , कोळी समाज रत्न पुरस्कार,  कोळी रत्नाकर पुरस्कार परंतु कोळी समाज भूषण आजचा पुरस्कार माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार असे राजेश खर्डे वेसावकर यांनी सांगितले कारण हा पुरस्कार महाराजांच्या नावावर आहे आणि मी खरोखरच शिवप्रेमी या संस्थेचे तसेच माझे लहान बंधू मित्र रोहित जी पाटील यांचे मनापासून धन्यवाद आणि आभार मानतो

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button