आमची मुंबईगुन्हेमहाराष्ट्रविशेषसामाजिक

मुंबईत ACBची कारवाई: वाहतूक पोलीस लाच घेताना रंगेहात पकडला

घाटकोपर वाहतूक विभागातील एका पोलीस कर्मचाऱ्याला लाच स्वीकारताना रंगेहात अटक

🚨 मुंबईत ACBची कारवाई: वाहतूक पोलीस लाच घेताना रंगेहात पकडला

मुंबई : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मुंबईत मोठी कारवाई करत घाटकोपर वाहतूक विभागातील एका पोलीस कर्मचाऱ्याला लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

प्रेसनोटनुसार, आरोपी पोलीस कर्मचारी सतीश गणेश राठोड (पोलीस शिपाई) यांनी तक्रारदाराकडून ₹1700 लाचेची मागणी केली होती. तक्रारदार हा रिक्षा चालक असून घाटकोपर पश्चिम परिसरात व्यवसाय करत होता. रिक्षा चालवण्यास अडथळा न आणण्यासाठी व दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी आरोपीने ही रक्कम मागितल्याचे समोर आले.

तक्रारदाराने याबाबत ACBकडे तक्रार दाखल केल्यानंतर सापळा रचण्यात आला. 24 एप्रिल 2026 रोजी करण्यात आलेल्या कारवाईत आरोपीला ₹1700 ची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ACBने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी लाच मागत असल्यास त्वरित तक्रार करावी.

#MumbaiNews #ACB #Corruption #TrafficPolice #BreakingNews

mumbai-acb-trap-traffic-police-bribe-case

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button