आमची मुंबईमहाराष्ट्र

नवी मुंबई महापालिकेत खळबळ! उपायुक्त कैलास गायकवाड ACB च्या जाळ्यात

अतिक्रमण विभागाचे उपायुक्त लाच घेताना रंगेहात अटक; महापालिका मुख्यालयातच कारवाई

 

नवी मुंबई महानगरपालिका च्या प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त कैलास गायकवाड यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) ने रंगेहात अटक केली.

ही धाडसी कारवाई महापालिका मुख्यालयातील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या त्यांच्या दालनातच करण्यात आली. अचानक झालेल्या या कारवाईमुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असून, संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकरणात तक्रार आल्यानंतर ACB ने सापळा रचून ही कारवाई केली. लाच स्वीकारताना गायकवाड यांना पकडण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे.

 

या घटनेमुळे महापालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनात पारदर्शकतेबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button