तब्बल १२ तासांनी रात्री ३ वाजता किरीट सोमय्या यांचे घाटकोपर पोलीस ठाण्यातील ठिय्या आंदोलन संपले..!!
जबाब घेणाऱ्या अधिकारांवर कारवाई करा माजी खासदार किरीट सोमय्या यांची मागणी

मुंबई – १२ तासांनी रात्री ३ वाजता किरीट सोमय्या यांचे घाटकोपर पोलीस ठाण्यातील ठिय्या आंदोलन संपले..!! घाटकोपर च्या नित्यानंद नगर विभागात दोन अल्पवयीन म्हणजे ५-६ वर्षांच्या मुलींवर फिरोज शेख ऊर्फ सन्नी या ३८ वर्षाच्या नरमधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती.आरोपीला घटनास्थळावरून पोलीस घेऊन जात असताना संतप्त जमावाने आरोपीला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिसांना देखील बेदम मारहाण केल्याचा आरोप पोलिसांचा होता.

त्यामुळे या रात्री दोन गुन्हे दाखल झाले एक पॉस्को अंतर्गत आरोपी फिरोज शेख वर, तर दुसरा गुन्हा आरोपीला मारहाण करीत असताना पोलिसांना मारहाण केल्याबद्दल…
याप्रकरणी पोलिसानी फिरोज सह पीडित मुलींचे काही नातेवाईक, स्थानिक नागरिक अश्या चार जणांन ही अटक केली. या वेळी पीडित मुलीच्या आईच्या जबाबात आरोपीला अटक करताना लोकांनी पोलिसांना ही मारले हा उल्लेख आला. आणि हे प्रकरण किरीट सोमय्या यांच्याकडे गेले. किरीट सोमय्या यांनी पीडितच्या आईकडे या बाबत विचारणा केली असता आपणच आपल्या लोकांच्या विरोधात कसा जबाब देऊ शकतो, हे आपण जबाबात बोललेलोच नाही असा पवित्रा घेतला. यामुळे किरीट सोमय्या यांनी संतप्त झाले. त्यांनी घाटकोपर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची पीडितांच्या कुटुंबासह भेट घेतली. मात्र त्यांच्या मनाचे दिलेल्या उत्तराने समाधान झाले नाही.
यामुळे आधी घाटकोपर पोलीस ठाणेचे प्रवेशद्वार आणि नंतर घाटकोपर पोलीस ठाण्याच्या कारागृह बाहेर त्यांनी आंदोलन सुरू ठेवले. जबाब घेणाऱ्या अधिकारांवर कारवाईची मागणी त्यांनी केली. या दरम्यान मुंबईचा महापौर रितुजी तावडे आणि आमदार पराग शहा यांच्यासह काही नगरसेवक ही या आंदोलनात सहभागी झाले. रात्री किरीट सोमय्या पोलीस ठाण्यातच झोपले. मात्र ३ वाजण्याच्या दरम्यान पोलीस आयुक्तांनी त्यांना हे प्रकरण गुन्हे शाखेला देणार असल्याचे त्यांनी त्यांना सांगितले .आणि हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. मात्र तब्बल १२ तास घाटकोपर पोलीस ठाण्यात हे आंदोलन सुरू राहिल्याने मोठ्या प्रमाणात इथे भाजप कार्यकर्ते आणि इतर नेतेमंडळी या ठिकाणी दाखल झाल्या होत्या..



