अंधेरी पश्चिमअंधेरी पश्चिम विधानसभाआमची मुंबईमहाराष्ट्रविशेषसामाजिक

शितलादेवी परिसरातील सोसायटीच्या आवारात सुरू असलेल्या अवैध व धोकादायक इडली-वडा सेंटरवर विरोधात गुन्हा दाखल 

समरस  सुखमय जनजीवन हो, वह रचना विकसायेंगे — सदैव सेवेसी तत्पर : दीपक कोतेकर (भाजप नगरसेवक)

शितलादेवी परिसरातील सोसायटीच्या आवारात सुरू असलेल्या अवैध व धोकादायक इडली-वडा सेंटरवर विरोधात गुन्हा दाखल

समरस  सुखमय जनजीवन हो, वह रचना विकसायेंगे — सदैव सेवेसी तत्पर : दीपक कोतेकर (भाजप नगरसेवक)

मुंबई – मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक ६७ चे भाजपा नगरसेवक दीपक कोतेकर हे सध्या ॲक्शन मोडमध्ये दिसून येत असून परिसरातील अवैध फेरीवाले आणि त्यांच्या माफियांविरोधात धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि परिसर स्वच्छ व सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

शितलादेवी परिसरातील एका सोसायटीच्या आवारात सुरू असलेल्या अवैध व धोकादायक इडली-वडा सेंटरवर आज मोठी कारवाई करण्यात आली. संबंधित व्यवसायामुळे स्थानिक रहिवाशांना त्रास होत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत होत्या. याची गंभीर दखल घेत नगरसेवक दीपक कोतेकर यांनी प्रशासनासह घटनास्थळी भेट देत संबंधित सेंटरचा कायमचा बंदोबस्त केला.

या कारवाईदरम्यान भाजपा मंडळ अध्यक्ष भवन कामतेकर तसेच वॉर्ड क्रमांक ६७ चे वॉर्ड अध्यक्ष शंकर शिंदे हे देखील उपस्थित होते. स्थानिक नागरिकांनी या कारवाईचे स्वागत करत परिसरातील अवैध धंद्यांवर आणखी कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

“सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. अवैध फेरीवाले, बेकायदेशीर व्यवसाय आणि माफियांना कोणतीही मुभा दिली जाणार नाही,” असा इशारा नगरसेवक दीपक कोतेकर यांनी दिला.

Slug:

Deepak-Kotekar-Action-Against-Illegal-Hawkers

Tag:

#DeepakKotekar #BJP #Ward67 #Mumbai #IllegalHawkers #ShitalaDevi #MumbaiNews #BMC #ActionMode

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button