आमची मुंबईके पूर्वगुन्हेमहाराष्ट्रविधीविशेषसामाजिक

16 कोटींच्या फसवणूक प्रकरणानंतर बीएमसीचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील बेपत्ता?

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत असलेल्या महानगर पालिकेचा सहायक आयुक्त फरार कसा आणि कुठे होऊ शकतो??

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेचा सहाय्यक आयुक्त फरार कसा आणि कुठे?

 

मुंबई : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत मानल्या जाणाऱ्या Brihanmumbai Municipal Corporation मधील सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्यावर 16 कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ते बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे “इतक्या मोठ्या आणि प्रभावशाली यंत्रणेतील अधिकारी अचानक गायब कसे झाले?” असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

 

मुंबई गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलमार्फत त्यांचा शोध सुरू असतानाच, महेश पाटील यांच्याशी संपर्क होत नसल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही त्यांच्यावर खंडणीसाठी मारहाणीचे गंभीर आरोप झाले होते आणि त्यांना सक्तीच्या रजेवरही पाठवण्यात आले होते.

 

आता पुनर्विकास प्रकल्पातील कोट्यवधींच्या गुंतवणुकीच्या कथित घोटाळ्यानंतर ते अचानक गायब झाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत :

 

महेश पाटील नेमके कुठे आहेत?

 

त्यांना कोणाचा राजकीय किंवा प्रशासकीय पाठिंबा आहे का?

तपास यंत्रणांना ते सापडत का नाहीत?

इतक्या मोठ्या प्रकरणानंतरही अटक का झालेली नाही?

दरम्यान, या प्रकरणात अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी मोठी गुंतवणूक केल्याची माहिती समोर येत असून, प्रकरणाचे पडसाद आता राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळातही उमटू लागले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button