आपली मुंबईआमची मुंबईमहाराष्ट्रमुंबईविशेषशैक्षणिकसामाजिक

मुलीच्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेचा त्याग; मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमित साटम कुटुंबाचा ‘राष्ट्र प्रथम’ निर्णय

‘राष्ट्र प्रथम’ ही भावना जपण्यासाठी देशहिताला प्राधान्य देत आम्ही हा निर्णय घेतला,” - आमदार अमित साटम (मुंबई भाजपा अध्यक्ष)

मुंबई – मुंबई भाजप अध्यक्ष व आमदार अमीत साटम यांनी आपल्या कुटुंबाशी संबंधित एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. अमीत साटम यांची १२ वर्षांची कन्या माहीका साटम हिने नुकतेच कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवत मोठे यश संपादन केले असून, दक्षिण कोरियातील सोल येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सहभागी होण्याची संधी तिला मिळाली होती.

मात्र, देशाचे पंतप्रधान यांनी देशहितासाठी काही काळ आंतरराष्ट्रीय प्रवास टाळण्याचे केलेले आवाहन लक्षात घेऊन साटम कुटुंबाने एकमताने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यानुसार माहीका साटम ही सोल येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी जाणार नसल्याचे अमित साटम यांनी स्पष्ट केले.

“स्पर्धा येतात आणि जातात… माहीकाला भविष्यात अशा अनेक मोठ्या संधी मिळतील, याची आम्हाला खात्री आहे. मात्र ‘राष्ट्र प्रथम’ ही भावना जपण्यासाठी देशहिताला प्राधान्य देत आम्ही हा निर्णय घेतला,” असे अमित साटम यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

या निर्णयात माहीकाने दाखवलेला समजूतदारपणा आणि देशाप्रती असलेली भावना अभिमानास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच पत्नी आणि मुलीने सकारात्मकतेने या निर्णयाला साथ दिल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले.

“देशहित सर्वोपरि. जय हिंद! जय महाराष्ट्र!” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

#NationFirst #RashtraPratham #AmeetSatam #MahikaSatam #BJPMumbai #JaiHind #JaiMaharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button