आमची मुंबईमहाराष्ट्रमुंबईविशेषसामाजिक

जुहू वर्सोवा लिंक रोडवर BEST बसची तीन वाहनांना धडक; जीवितहानी टळली

ओशिवरा डेपोची मार्ग क्रमांक २०० ही BEST बस सकाळी प्रवाशांना घेऊन जाताना घडला अपघात

 

मुंबई : अंधेरी पश्चिम येथील जुहू वर्सोवा लिंक रोडवर गुरुवारी सकाळी BEST बसचा भीषण अपघात झाला. BEST बसने समोरील तीन वाहनांना जोरदार धडक दिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या अपघातात दुचाकी, रिक्षा आणि चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, ओशिवरा डेपोची मार्ग क्रमांक २०० ही BEST बस सकाळी प्रवाशांना घेऊन जात असताना राजीव गांधी महाविद्यालयाजवळ अचानक नियंत्रण सुटल्याने समोरील वाहनांना धडकली. धडकेनंतर एकामागोमाग एक वाहने एकमेकांवर आदळल्याने साखळी अपघात झाला.

 

अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. त्यानंतर पोलिस आणि BEST प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

 

या अपघातात बसचालकाला मानसिक धक्का बसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी घटनेची नोंद घेत पुढील तपास सुरू केला असून BEST प्रशासनाकडून अंतर्गत चौकशीही करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button