अंधेरी पश्चिमअंधेरी पश्चिम विधानसभाआमची मुंबईके पश्चिम विभागमहाराष्ट्रमुंबईविशेषसामाजिक

मुंबई महानगरपालिकेच्या स्टँडिंग समितीतील ‘अंडरस्टँडिंग’ बंद — आमदार अमीत साटम ( मुंबई भाजपा अध्यक्ष)

२७ शालेय वस्तूंची खरेदी आता ‘GeM’ पोर्टलद्वारे होणार

मुंबई महानगरपालिकेच्या स्टँडिंग समितीतील ‘अंडरस्टँडिंग’ बंद — आमदार अमीत साटम ( मुंबई भाजपा अध्यक्ष)

मुंबई : मुंबई महानगरपालिकेत महायुतीची सत्ता आल्यानंतर पहिल्या १०० दिवसांत घेतलेल्या २३ महत्त्वाच्या निर्णयांमुळे प्रशासनात पारदर्शकता आणि भ्रष्टाचारमुक्त कारभाराची सुरुवात झाली असल्याचा दावा भाजप मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी केला आहे. याचबरोबर महानगरपालिकेच्या स्टँडिंग कमिटीमधील कथित ‘अंडरस्टँडिंग’ पूर्णपणे बंद करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 

पत्रकार परिषदेत बोलताना साटम यांनी सांगितले की, गेल्या २५ वर्षांनंतर पालिकेत सुशासनाची नवी सुरुवात झाली आहे. अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये पारदर्शकता आणण्यात आली असून, अधिकृत फेरविचारासाठी कोड प्रणाली लागू करण्यात येत आहे.

 

यावेळी महापौर ऋतु तावडे, सभागृहनेते गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे तसेच शिवसेना गटनेते अमेय घोले उपस्थित होते.

 

महत्त्वाचे निर्णय :

 

२७ शालेय वस्तूंची खरेदी आता ‘GeM’ पोर्टलद्वारे होणार

 

औषधे आणि वैद्यकीय उपकरण खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता

 

भायखळा प्राणीसंग्रहालयातील ४५० कोटींची निविदा रद्द

 

३८५ कोटींचे रेलिंग टेंडर रद्द

 

रस्ते कंत्राटातील १५० कोटींची बचत

 

गर्गाई-पिंजाळ जलयोजनेत २०० कोटींची बचत

 

मुंबई क्लीन-अप मोहिमेला गती

 

बनावट जन्म-मृत्यू दाखल्यांच्या घोटाळ्याचा पर्दाफाश

 

१,९०० किमी रस्त्यांची कामे पूर्ण

 

२०२७ पर्यंत ९३ टक्के रस्ते काँक्रीटीकरणाचे लक्ष्य

 

 

तसेच मुंबईत पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी आयआयटी तज्ज्ञांच्या मदतीने विशेष आराखडा तयार करण्यात येत असल्याची माहितीही देण्यात आली.

 

याशिवाय :

 

संविधान मूल्यांवर आधारित अभ्यासक्रम

 

मुलींना गर्भाशय मुखाच्या कर्करोग प्रतिबंधक लस मोफत

 

मराठी भाषेच्या प्रसारासाठी विशेष तरतूद

 

झोपडपट्टी दत्तक वस्ती योजनेत बदल

 

प्राणीसंग्रहालयासाठी दोन आशियाई सिंहांची मागणी

 

अशा विविध निर्णयांची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button