आमची मुंबईगुन्हेमहाराष्ट्रमुंबईविशेषसामाजिक

Maharashtra News 9 च्या वृत्ताचा प्रभाव; जोगेश्वरी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपीला राजस्थानातून अटक

आंबोली पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांची मोठी कामगीरी १०० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून मुख्य आरोपी सबीर शेख याला राजस्थानातून केले अटक

Maharashtra News 9 च्या वृत्ताचा प्रभाव; जोगेश्वरी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपीला राजस्थानातून अटक

जोगेश्वरी पश्चिम येथे ८ वर्षीय रेवा पवार हिला दुचाकीने धडक देऊन फरार झालेल्या प्रकरणात अखेर मुंबई पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. चार दिवसांच्या तपासानंतर आणि जवळपास १०० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून मुख्य आरोपी सबीर शेख याला राजस्थानातून अटक करण्यात आली आहे. तर दुचाकीवरील दुसऱ्या साथीदाराचा शोध अद्याप सुरू आहे.

 

या घटनेनंतर Maharashtra News 9 ने सर्वप्रथम या प्रकरणाचा पाठपुरावा करत स्थानिक नागरिक आणि जखमी चिमुकली रेवा पवार हिच्या आईची मुलाखत प्रसारित केली होती. नागरिकांनी आरोपीला तातडीने अटक करण्याची आणि निष्काळजी वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी केली होती.

या प्रकरणाची सातत्याने दखल घेत मुंबई पोलिसांनी तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढत त्याला राजस्थानातून अटक केली. आरोपीला मुंबईत आणून पुढील चौकशी करण्यात येत असून फरार साथीदाराचा शोध सुरू आहे.

https://www.facebook.com/share/v/1Ksc13X9ZC/

Maharashtra News 9 चे मुख्य संपादक नागेश कळसगौंडे यांनी स्थानिक नागरिक रेवा पवार व नगरसेवक विठ्ठल बंदेरी यांची मुलाखत घेतलेली लिंक

Maharashtra News 9 जनतेच्या प्रश्नांना सातत्याने आवाज देत राहील आणि अशा महत्त्वाच्या प्रकरणांचा पाठपुरावा करत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button