आमची मुंबईमहाराष्ट्रमुंबईराजकीय बातमीविशेषसामाजिक

*सुनिल जैन खाबिया यांच्या पुढाकाराने अंधेरीत श्री जगन्नाथ रथयात्रेचे भव्य स्वागत; ५ हजार भाविकांना जल वाटप*

"धर्म, संस्कृती आणि समाजसेवा यांचा संगम घडविणाऱ्या अशा उपक्रमांमधून जनसेवा करण्याची संधी मिळणे हे आमचे भाग्य- सुनिल जैन खाबिया

*सुनिल जैन खाबिया यांच्या पुढाकाराने अंधेरीत श्री जगन्नाथ रथयात्रेचे भव्य स्वागत; ५ हजार भाविकांना जल वाटप*

 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अंधेरी पश्चिम विधानसभा समन्वयक सुनिल जैन खाबिया यांच्या पुढाकाराने इस्कॉन, जुहू आयोजित श्री श्री जगन्नाथ, बलदेव व सुभद्रा रथयात्रेचे अंधेरी पश्चिम येथे उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी भगवान श्री जगन्नाथ, बलदेव व सुभद्रा यांच्या रथाचे स्वागत, पूजन व दर्शन करून सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली.

रथयात्रेदरम्यान सुनिल जैन खाबिया यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीने सुमारे ५ हजार भाविकांना जल वाटप करण्यात आले. या सेवाभावी उपक्रमाला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आयोजकांचे कौतुक केले. या प्रसंगी शिवसेना उपनेते अमोल कीर्तिकर, महिला विभाग संघटक अनिता ताई बागवे, महिला विधानसभा प्रमुख वीणा टॉक, महिला श संघटक माजी नगरसेविका ज्योत्स्ना दिघे, उपविभागप्रमुख प्रसाद आयरे, महिला उपविभाग संघटक रंजना पाटील, संजीवनी घोसाळकर, शाखाप्रमुख सुधाकर अहिरे, संजय जाधव, उदय महाले, महिला शाखा संघटक प्रीती खारवी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इस्कॉन, जुहू यांच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या श्री जगन्नाथ रथयात्रेत यंदाही हजारो भाविक सहभागी झाले होते. संपूर्ण परिसर ‘जय जगन्नाथ’च्या जयघोषाने दुमदुमून गेला असून भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले. यावेळी सुनिल जैन खाबिया यांनी सांगितले की, “धर्म, संस्कृती आणि समाजसेवा यांचा संगम घडविणाऱ्या अशा उपक्रमांमधून जनसेवा करण्याची संधी मिळणे हे आमचे भाग्य आहे. भविष्यातही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अंधेरी पश्चिम विधानसभा जनहिताचे आणि सेवाभावी उपक्रम सातत्याने राबवत राहील.संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन सुनिल जैन खाबिया यांनी केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button