आमची मुंबईमहाराष्ट्रमुंबईविशेषसामाजिक

मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी राजकीय नेत्यांकडून शिफारशी केल्या जात असल्याचा गंभीर प्रकार

225 अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नावांसमोर मंत्री, आमदार, खासदार व लोकप्रतिनिधींची नावे एकनाथ शिंदे यांच्या नावाचा सर्वाधिक उल्लेख; रामदास आठवले दुसऱ्या क्रमांकावर

 

मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी राजकीय नेत्यांकडून शिफारशी केल्या जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. उपलब्ध यादीमध्ये एकूण 225 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे असून त्यांच्या नावांसमोर मंत्री, आमदार, खासदार, उपमहापौर तसेच नगरसेवकांची नावे नमूद आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांस शहर अभियंता कार्यालयने सविस्तर यादी दिली आहे.

माहिती अधिकारातून उपलब्ध झालेल्या 225 अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नावांसमोर नमूद राजकीय शिफारशींच्या प्राथमिक विश्लेषणात काही राजकीय व्यक्तींची नावे वारंवार आढळून आली आहेत. यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नावाचा सर्वाधिक 10 वेळा उल्लेख असून त्यानंतर रामदास आठवले यांच्या नावाचा 9 वेळा, तर गिरीश महाजन आणि कालिदास कोळंबकर यांच्या नावांचा प्रत्येकी 7 वेळा उल्लेख आहे. तसेच मंगेश कुडाळकर, अण्णा बनसोडे, आणि तुकाराम काते यांच्या नावांचा प्रत्येकी 6 वेळा उल्लेख करण्यात आला आहे. मुरजी पटेल, दिलीप लांडे यांच्या नावाचा 5 वेळा तर नरहरी झिरवळ, सुमीत वानखेडे, राहुल शेवाळे, प्रकाश सुर्वे, इंद्रनील नाईक, संतोष बांगर, राम कदम प्रकाश सुर्वे, किशन कथोरे आणि बच्चू कडू यांच्या नावांचा प्रत्येकी 4 वेळा, तर चंद्रशेखर बावनकुळे, हसन मुश्रीफ, भरतशेठ गोगावले, उदय सामंत, परिणय फुके, रविंद्र वायकर, प्रसाद लाड, सुनील प्रभू, महेश सावंत आणि प्रविण दरेकर यांच्या नावांचा प्रत्येकी 3 वेळा उल्लेख आहे. याशिवाय प्रताप राव जाधव, पंकजा मुंडे, मंगल प्रभात लोढा, रावसाहेब दानवे, संजय घाडी, राहुल नार्वेकर, जयकुमार गोरे, आणि सना मलिक यांच्या नावांचा प्रत्येकी 2 वेळा, तर रविंद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, आणि संजय बनसोडे यांच्या नावांचा प्रत्येकी 1 वेळा उल्लेख आढळतो.

 

या यादीच्या पार्श्वभूमीवर माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली म्हणाले की. “महापालिकेतील बदल्या प्रशासकीय गरज, सेवाज्येष्ठता आणि पारदर्शक निकषांच्या आधारे होणे अपेक्षित आहे. मात्र 225 अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नावांसमोर मंत्री, आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधींची नावे असलेली यादी समोर आली आहे” असे अनिल गलगली यांनी सांगितले. याबाबत महापालिका आयुक्तांनी अस्तित्वात असलेल्या नियमांप्रमाणे राजकीय दबाव आणणाऱ्या अधिकारी वर्गावर शिस्तभंगाची कारवाई करणे अपेक्षित आहे.

 

या यादीमध्ये Assistant Engineer (AE), Sub Engineer (SE), Executive Engineer (EE) आणि Junior Engineer (JE) या पदांवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

 

यादीतील नोंदी पुढीलप्रमाणे आहेत. रविंद्र घाटगे ( संतोष बांगर) ; सुनील शेठे- (प्रकाश सुर्वे, परिणय फुके) ; दीपक नागासोगे-( मुरजी पटेल); गजेंद्र काकड( महेंद्र दळवी); रविंद्र दरेकर ( अण्णा बनसोडे, प्रकाश सुर्वे) ; अंजली धोरे -(किशोर आप्पा पाटील); सचिन मेंढे- (वर्षा गायकवाड); प्रशांत जगताप( इंद्रनील नाईक, हसन मुश्रीफ); निलेश परब( मनिषा चौधरी, गिरीश महाजन); हेमंत पंत- (प्रवीण दरेकर); पद्माकर चव्हाण-( मकरंद पाटील); विशाल पाटील- (अण्णा बनसोडे); प्रकाश शिंगारे-( मेघना बोर्डीकर); संदीप घोगरे-( डॉ. पंकज भोयर); नारायण मेंघारे- (संतोष बांगर); सागर गायकवाड – (संजय दिना पाटील); राजेंद्र राठोड -(शिवेंद्रराजे भोसले); हरीश चव्हाण- (अण्णा बनसोडे); चेतन पाटील-(राम कदम); व्यंकटेश आवळे-(बच्चू कडू); शुभम चव्हाण-(मुरजी पटेल); नेहा नितीन सांखे-( उदय सामंत); प्रसाद धुमाळे-(रविंद्र वायकर); सुनील यमगर- मुरजी पटेल; प्रसाद पटवर्धन- (धनंजय गाडगीळ); हर्षल पिंपळे-( किसन कथोरे); पूर्णिमा भोईर-(कालिदास कोळंबकर); संतोष भडवेकर-( प्रवीण दरेकर); विद्यसागर भामावले-(प्रसाद लाड); नितीन चौधरी-(राहुल शेवाळे); जयंत बोरशे-(प्रकाश सोलंके); समीर सणप-(संजय घाडी); सचिन हणमधर- (मुरजी पटेल); सिद्धिविनायक खडपकर-( दिलीप लांडे); योगेश पारटे-( तुकाराम काते); रुपेश भांडगे-(संजय केळकर); रमेश सोनवणे-(राम कदम); किशोर क्षेत्री-( बाबासाहेब पाटील); मयूर पाटील-(भरतशेठ गोगावले); रेणुका पाटील-(इंद्रनील नाईक); विजय श्यामोथे-( दिलीप लांडे); दिनेश नांचे-( रामदास आठवले); चेतन पाटील-(संजय दिना पाटील); अनुप ठाकूर-( सुमित वानखेडे); महेश नांदेकऱ-( राधाकृष्ण विखे पाटील); संदीप देसाई-( संजय शिरसाट); अभय सांख्ये-( चंद्रशेखर बावनकुळे); सचिन दुधभाते-( भरतशेठ गोगावले); रविंद्र गवाडे-(कालिदास कोळंबकर); उस्मान सादिक-) सना मलिक); दीपक चौगुले-(दिलीप लांडे); सिद्धार्थ अग्रवाल-( हारून शेख, रंजना पाटील) ; सचिन दाऊर-( सुरेश कोपारकर); संदीप साळुंखे -(कालिदास कोळंबकर); केशव ओवे-(रामदास आठवले); राहुल निगोले-(कॅप्टन तमिळ सेल्वन); विकास सोनुने-( उदय सामंत); विकी साळुंखे-( संजय राठोड), साईनाथ गलवाड-(डॉ. भागवत कराड, गिरीश महाजन, अबू आझमी); जमीर पठाण-(सुनील प्रभू); रोशन झेमसे-(एकनाथ शिंदे); अक्षय दुधाण-( एकनाथ शिंदे); प्रशांत पाथारे -(एकनाथ शिंदे); अंगराज गणपत-( एकनाथ शिंदे); आनंद जाधव-(एकनाथ शिंदे); अमित गहाणे-(एकनाथ शिंदे); प्रविण तिरकेकर-(एकनाथ शिंदे); विवेक पाटील-(माधुरीताई मिसाळ); रवी गुप्ता-(चंद्रशेखर बावनकुळे); योगेश कोकणी-(प्रकाश सुर्वे); प्रविण मुळूक-(प्रकाश सुर्वे); माधव बाचेवाड-( अशोक चव्हाण); शीतल काळे-(सना मलिक); ओंकार माने-( डॉ. भागवत कराड); शालका खाडे (संजय बनसोडे); भूषण गवळी-(रामदास आठवले); शाहबाज पिरजादे —( हसन मुश्रीफ); संदेश वानखेडे —(कालिदास कोळंबकर); संतोष घवारे-(एकनाथ शिंदे); शरिता ठाकूर-( किसन कथोरे); सागर थिटे — (रविंद्र वायकर); स्वप्निल देवरुखकर -(रामदास आठवले); कार्तिक गांधी — (राम पांडगळे, इंद्रनील नाईक, मेघना बोर्डीकर); सचिन सोनवणे — (मनोज जामसुतकर, मनिषा चौधरी); रामदास कवडेकर —( प्रसाद लाड, रामराव वडकुते); वलसंगीकर अब्दुल मतीन —( शिवेंद्रराजे भोसले, महेंद्र थोरवे); निलेश नरकर — (गुलाबराव पाटील); गिरीश सिंह — (महेंद्र दळवी); जयंत तामखेडे —( हारून शेख); संतोष पुजारे — (मोनिका राजळे); राहुल निकम — (संजय घाडी); अंगराज पुरी — (आकाश राजपुरोहित); राजू डामसे —( रविंद्र चव्हाण); गोविंद देवकाते — (राम कदम); मिलिंद शाव्ही —( एकनाथ शिंदे, अतुल थोपटे — प्रविण तायडे) ; निलेश काळंबे —( चंद्रशेखर बावनकुळे); अकबर खान — (छगन भुजबळ); सतीश करांडे — (राहुल नार्वेकर); सुदीप शिंदे — (अण्णा बनसोडे); निखिल नालवडे — (शंभूराज देसाई); जयेश राऊत —( बच्चू कडू); राजू डामसे — (रामदास आठवले); गोपाल माळी — (परिणय फुके); संदीप सावंत —( गोपीचंद्र पडळकर); अमित पाटील — (चंद्रकांत पाटील); किरण कांबळे — (सुरेश भोळे); प्रदीप चंदनशिवे — (जयकुमार गोरे); अमृता पाटील —( जयंत पाटील); धीरज करांडे — (मंगलप्रभात लोढा); सुधाकर चव्हाण — (गिरीश महाजन); सुशांत पाटील —( हसन मुश्रीफ); आनंद साळवे — (इंद्रनील नाईक); देवेंद्र उघडे — (सुमित वानखेडे); निखिल शेटे — (अंबादास दानवे); अमोल चव्हाण — (राम शिंदे); अमित जाधव — (संजय राठोड); स्वप्निल देवरुखकर — (अमय घोले); विकास पुरळीक —( सुनील राणे); शरदचंद्र खाडे — (किसन कथोरे); मनीष टाके —( तुकाराम काते); संदीप खरात — (दिलीप लांडे); रविकांत देवकर — (रामदास आठवले); प्रदीप पवार — (मुरजी पटेल); शिवरंजन शिगेटे — (दीपक केसरकर); वैभव निंबाळकर — (गणेश नाईक); सचिन भुरके —( मनिषा चौधरी); पल्लवी ताटेकर — (मकरंद पाटी); विकास धोंड — (श्रीकांत शिंदे), स्वप्निल गुंड — (राहुल कुल); अमोल पाटील —( दत्तात्रय भरणे); खिरीश लिमजे — (सुनील प्रभू); विजय साळे —( अमोल खाटाळ); अभिलाषा सोनवणे — (महेश सावंत); कल्पना कोतवाल — (अतुल सावे); सचिन कुलकर्णी — (नरहरी झिरवळ); मनोज दुबे — (नरहरी झिरवळ); निरवकुमार जशूर — (हारून खान); संतोष भिलारे —( नरहरी झिरवळ); राजेश तावडे — (मिहीर कोटेचा); ऋतुराज गोहिलोट —( तुकाराम काते); सागर चारुडे —( मंगेश कुडाळकर); सुनील चाळवाड —( मंगेश कुडाळकर); अरविंद सोनार —( डॉ. हेमंत सावरा, राजेंद्र गावित); पवन कुलकर्णी — (दिलीप लांडे); रोहित कथोरे — (किसन कथोरे); निशा दळवी —( मंगेश कुडाळकर); राहुल जाधव — (कालिदास कोळंबकर); महेश पाटील — (मंगलप्रभात लोढा); श्रीरंग धर्माधिकारी — (मनिषा चौधरी); प्रमोद ब्रामणकर —( शहाजी पाटील); सुनील पाटकर — (प्रवीण दरेकर); सचिन पाटील —( रावसाहेब दानवे); सागर पाटील —( रामदास आठवले); प्रदीप काजरोलकर — (मकरंद पाटील); क्षितिजा यावली — (राधाकृष्ण विखे पाटील); रुपेश कोठारे — (हिरामण खोसकर); युवराज पांढरे — (कालिदास कोळंबकर); रोहित शेलकांडे — (परिणय फुके, गिरीश महाजन, शिवराज पाटील,पृथ्वीराज देशमुख); रिमिका भुतकर — (रामदास आठवले); भरत उरिशकर — (संतोष बांगर); जगदीश तुपे — (संजय शिरसाट), अरविंद कदम — (राधाकृष्ण विखे पाटील); धनश्री हुसेकर —( नरहरी झिरवळ); दीपक मुंढे —( गिरीश महाजन); ज्ञानदीप महाजन — (अजय चौधरी); राहुल निगोले — (प्रतापराव जाधव); अभिजीत रशाळ —( प्रतापराव जाधव); अमोल भेळेकर —( मोनिका राजळे); प्रथमेश जाधव — (चंद्रकांत हंडोरे) ; सुधांशु दवारे —( संतोष बांगर); शोभांगी गोसावी — (तुकाराम काते); अर्जुन सुळाणे —( आकाश फुंडकर); अभिषेक पाटील — (प्रसाद लाड); प्रियंका खरात — (विक्रम बाबनराव पाचपुते, सुमित वानखेडे); राजेंद्र पुजारी — (शिवाजी पाटील); चंद्रभागा माने — (मुरजी पटेल); राकेश कुमार झा — (एकनाथ शिंदे); कृष्णकुमार पुरोहित — (सुमित वानखेडे); भरत मोमले —( राहुल शेवाळे); राहुल लांडगे — (राहुल नार्वेकर); रोशन जिभकाटे — (राहुल शेवाळे); योगेश चौधरी — (अमीन पटेल); राजेंद्र बर्वे — (सुनील राऊत); वैभव गोडसे — (संजय केळकर); कुणाल भंडारी — (मनिषा चौधरी); प्रसाद धुमाळे — (रविंद्र वायकर; पंकज भोईर, रवी राणा); राणा जयस्वाल — (बच्चू कडू); दीपक जाधव — (अण्णा बनसोडे); दीपक कोरगावकर — (उदय सामंत); अशेष भोईर —( उदयनराजे भोसले); कल्पना दळवी — (बच्चू कडू); मिथुन भिसे —( जयकुमार गोरे); विश्वनाथ माने — (भरतशेठ गोगावले); राकेश शिंदे —( अण्णा बनसोडे) ; नितीन बाविस्कर — (राम कदम); हेमंत पंत —( अतुल भातखळकर); दिगंबर मोरे — (सुरेश धस); सुभाष कांबळे —( तुकाराम काते); सचिन सांगळे — (पंकजा मुंडे) ; मोहसीन खान —( मंगेश कुडाळकर); सुनील साळुंखे — (पंकजा मुंडे); सावेंद्र जाधव — (मंगेश कुडाळकर); अनिल विजापूरे — (रामदास आठवले); महेंद्र जागीर — (महेश सावंत); सागर मोरे —( गिरीश महाजन); सागर अडसुळ —( राहुल शेवाळे); सुहास माळी — (महेश सावंत); शुभम होळकुंडे — (अभिमन्यू पवार); मयुरी पवार — (पराग शाह); किशोर आहिरे — (मंगेश कुडाळकर); संजोग ठाकूर — (समीर मेघे); अमोल मेहर — (किशोर आप्पा पाटील); युवराज बेळेकर — (प्रकाश आबिटकर); गणेश सातपुते — (मनिषा चौधरी); महेश चौगले — (सुनील प्रभू); सोनल आव्हाड — (अजय चौधरी); शैलेश जाधव — (अतुल भातखळकर); आदिनाथ वानवे — (रावसाहेब दानवे); प्रविण खरात — (तुकाराम काते); अशोक पवार — (माणिकराव कोकाटे); किशोर धागर — (गिरीश महाजन)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button