बेकरीवर कारवाई न करण्यासाठी ७० हजारांची लाच! BMC ‘के/पश्चिम’ विभागातील कर्मचारी ACBच्या जाळ्यात; ६० हजार स्वीकारताना रंगेहाथ पकडले
के पश्चिम विभाग यांनी पुन्हा खाल्ली माती एकाच महिन्यात दुसऱ्यांदा के पश्चिम विभाग मधील अधिकारी एसीबी ट्रॅप मध्ये अडकले
बेकरीवर कारवाई न करण्यासाठी ७० हजारांची लाच! BMC ‘के/पश्चिम’ विभागातील कर्मचारी ACBच्या जाळ्यात; ६० हजार स्वीकारताना रंगेहाथ पकडले

मुंबई : बेकरीचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी तसेच बेकरीवर कोणतीही कारवाई न करण्याच्या मोबदल्यात ७० हजार रुपयांची लाच मागितल्याचा गंभीर प्रकार मुंबई महापालिकेच्या के/पश्चिम विभागात समोर आला आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई करत विजय पाटील या कर्मचाऱ्याला ६० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. तसेच दुय्यम अभियंता निरवकुमार चुनीलाल जैसर यालाही ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बेकरी व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी आणि व्यवसायावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी संबंधितांकडून ७० हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. याबाबत ५० वर्षीय तक्रारदाराने २ सप्टेंबर रोजी ACBकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या पडताळणीदरम्यान विजय पाटील याने ६० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर ACBने सापळा रचला.
बुधवारी के/पश्चिम वॉर्ड कार्यालयाच्या तळमजल्यावरील लिफ्टजवळ विजय पाटील याला ६० हजार रुपयांची लाच स्वीकारताना ACBच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्याचवेळी या प्रकरणातील दुय्यम अभियंता निरवकुमार चुनीलाल जैसर यालाही ताब्यात घेण्यात आले.

के पश्चिम विभाग यांनी पुन्हा खाल्ली माती असून एकाच महिन्यात दुसऱ्यांदा के पश्चिम विभाग मधील अधिकारी एसीबी ट्रॅप मध्ये अडकले आहेत गेल्या महिन्यात जुलै मध्ये चाळीस हजार रुपये लाच घेतना जल मापक एसीबी ट्रॅप मध्ये अडकडला होता
या कारवाईमुळे मुंबई महापालिकेच्या विभागीय कार्यालयांमध्ये नागरिकांकडून होणाऱ्या कथित लाच मागणीच्या प्रकारांवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बेकरीसारखा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठीच लाचेची मागणी झाल्याने या प्रकरणाची महापालिका प्रशासनाकडूनही गांभीर्याने दखल घेतली जाण्याची शक्यता आहे. यात आणखी वरिष्ठ अधिकारी यांचा देखील सहभाग होता का याची देखील चौकशी करण्याची गरज आहे.
धक्कादायक मुद्दे
💰 सुरुवातीला ७० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप
🚨 पडताळणीत ६० हजारांची मागणी निष्पन्
👮 ACBच्या सापळ्यात ६० हजार स्वीकारताना विजय पाटील पकडला
🏢 कारवाई BMC के/पश्चिम वॉर्ड कार्यालयात
👤 दुय्यम अभियंता निरवकुमार चुनीलाल जैसर ताब्यात
⚠️ बेकरीवर कारवाई न करण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप

