अंधेरीतून पी बी कोकरे यांच्या नेतृत्वाखाली सकल धनगर समाजाचा इशारा
“दीपक बोऱ्हाडे यांच्या जीवाचं बरं वाईट झाल्यास जबाबदार सरकार”

अंधेरीतून पी बी कोकरे यांच्या नेतृत्वाखाली सकल धनगर समाजाचा इशार;

“दीपक बोऱ्हाडे यांच्या जीवाचं बरं वाईट झाल्यास जबाबदार सरकार”
जालना येथे धनगर समाजाचे नेते दीपक भाऊ बोऱ्हाडे यांनी १७ सप्टेंबरपासून सुरू केलेले आमरण उपोषण गंभीर वळणावर पोहोचले आहे. एसटी प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी, यासाठी बोऱ्हाडे यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. परंतु, उपोषणाला दहा दिवसांपेक्षा जास्त काळ उलटूनही शासनाच्या स्तरावर ठोस भूमिका न घेतल्याने धनगर समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दीपक बोऱ्हाडे यांची प्रकृती चिंताजनक होत चालली असून, त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्यापूर्वी शासनाने तातडीने धनगर समाजाला एसटी आरक्षणाचा जीआर काढून उपोषण थांबवावे, अशी मागणी विविध ठिकाणांहून जोर धरू लागली आहे.

मुंबईतील अंधेरी भागातील धनगर समाजाने या संदर्भात तहसीलदार मार्फत सरकारला निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी शासनाला इशारा देताना म्हटले आहे की, “दीपक भाऊ बोऱ्हाडे यांच्या जीवाचं बरं वाईट झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारवर राहील. धनगर समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून सरकार जातीयवादाचा खेळ खेळत आहे. मात्र, आणखी विलंब झाल्यास हा जातिवाद झटक्यात बाहेर काढू.”
17 सप्टेंबर पासून जालना येथे उपोषण करत असणारे धनगर उपोषणकर्ते दीपक भाऊ बोऱ्हाडे यांच्या जीवाचं बरं वाईट होण्यापूर्वी फडणवीस सरकारने धनगर st आरक्षण अंमलबजावणीचा GR पारित करून उपोषण थांबवावे अन्यथा फडणवीस सरकारच्या जातिवाद झटक्यात बाहेर काढू असा इशारा अंधेरीतील सकल धनगर समाजाचा वतीने पत्राव्दारे तहसीलदार मार्फत सरकारला देण्यात आला आहे
निवेदन देतेवेळी उपस्थित
श्री पी बी दादा कोकरे
श्री योगेश गोरे
श्री संजय कोळापटे
श्री संजय बोडके
श्री कोंडीबा पिंगळे
श्री धोंडिबा लांबोर
श्री राहुल शेळके
श्री राहुल कस्तुरे
श्री मारीअप्पा कुशाळकर उपस्थित होते
या आंदोलनामुळे राज्य सरकारवर प्रचंड दबाव वाढला आहे. जालना येथे सुरू असलेल्या उपोषणाला राज्यभरातून धनगर समाजाचा मोठा प्रतिसाद मिळत असून, अंधेरीसह मुंबईतील विविध भागांतून शासनाला इशारे दिले जात आहेत.

सध्या सर्वांचे लक्ष सरकारकडे लागले असून, दीपक बोऱ्हाडे यांच्या आरोग्याबाबतची परिस्थिती गंभीर होत असल्याने पुढील काही दिवसांत सरकार कोणता निर्णय घेते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे




