आमची मुंबईमनोरंजनमहाराष्ट्रमुंबईविशेषसामाजिक

पूनम नंदकिशोर राठी यांचे स्वप्न सत्यात उतरताना

गुरू श्री सदाशिव सावंत व पती श्री नंदकिशोर राठी यांच्या मुळे लग्नाच्या २५ वर्षा नंतर चित्रकार झाली - पूनम नंदकिशोर राठी

मुंबई – चित्रकाराच्या कुंचल्यातून रिकाम्या कॅनव्हासच्या आयुष्यात रंग भरले जातात तसेच रंग पुनम नंदकिशोर राठी यांच्या आयुष्यातही चित्रांमुळे भरले आहेत. पुनम यांना आयुष्यात चित्रकलेचे वरदान असल्यासारखे आहे. “सो कलम, पेन्सिल और ब्रश मेरी ताकद” असल्याचे पुनम नेहमीच म्हणतात. चित्रांद्वारे आपल्या मनातील भावना पूनम कॅनव्हासवर उमटवतात. खरंतर, चित्रकार एखाद्या जादुगारासारखा असतो. त्याने रेखाटलेले चित्र एखाद्याच्या मनाला कधीकधी भारावून टाकते तर कधी जुन्या आठवणीही आठवण्यास भाग पाडते. नेहमीच म्हटले जाते की, कला क्षेत्रातील व्यक्ती खऱ्या अर्थाने सुखी असतो याचे उदाहरण पूनम यांच्या पेटिंग्स आहेत. अॅक्रॅलिक ते पेन्सिल स्केचच्या माध्यमातून हुबेहुब व्यक्तीमत्व असो किंवा एखादे पोट्रेट सत्यात उतरवण्याची अनोखी कला पूनम यांच्या हातात आहे. वडिलांच्या आर्किक्टेचर क्षेत्रातील प्रवासाने मुलीच्या आयुष्यात रंग भरण्याचे काम केलेय.

बालपणी रेखाटलेली चित्रे वडिलांकडून जपून ठेवण्यासह खास व्यक्तींना गिफ्टही दिली गेलीत. यामधून प्रत्येकवेळी नवे चित्र रेखाटण्याची प्रेरणा पुनम यांच्यामध्ये वेळोवेळी निर्माण होत गेली. म्हणतात ना नशीबात असेल तर मिळते पण वेळ लागतो तसेच काहीसे पूनम यांच्यासोबतही झाले. लग्नानंतर सर्वकाही बदलले गेले. चित्रकाराचे स्वप्न जे उराशी धरले होते त्याला दूर अंतर मिळत गेले. घर-संसारात मग्न होता होता कधी चित्रांचे जग हरवले गेले हे पूनम यांना कळले नाही. पण वडिलांनी जशी कलेची आवड ओखळून साथ दिली तशीच साथ नवऱ्यानेही चित्रांच्या जगात पुन्हा जगण्यासाठी दिली.मुंबईत आल्यानंतर एखाद्या मॉलमध्ये गेल्यानंतर तेथील आर्ट क्लास पाहून पूनम यांचे मन भरून यायचे. हीच उत्सुकता पूनम यांच्या आयुष्यभराच्या जोडीदाराने वेळीच टिपली आणि त्यांना आपली कला पुन्हा जोपासण्यास पाठबळ दिले. येथूनच चित्रकारिकतेचा पुन्हा प्रवास सुरु झाला.

यादरम्यान सदाशिव सावंत यांच्या माध्यमातून चित्रांच्या जगातील नवनवे धडे गिरवण्यास पुन्हा सुरुवात झाली. सदाशिव सावंत पूनम यांच्यासाठी चित्रांच्या जगातले गुरुच म्हणावे लागतील. “कोशिश करने वालो की कभी हार नही होती” हेच वाक्य नेहमीच लक्षात ठेवून पूनम यांनी सदाशिव सर यांच्यासोबत चित्रांच्या जगातील प्रत्येकवेळी काही गोष्टी नव्याने शिकल्या. आज माझ्या पेन्सिलमध्ये जादू असल्याचे पूनम म्हणतात. रंग जेव्हा कॅनव्हासवर उतरतात तेव्हा केवळ पांढरा कॅनव्हासच नव्हे तर आयुष्यातही रंग भरले जातायत याची प्रचिती पूनम यांच्या पेटिंग्समधून येते. मनाला उत्साह आणि आनंद देणाऱ्या प्रत्येक गोष्टी व्यक्तीने आयुष्यात कराव्यात असे पूनम म्हणतात. कारण एखादा छंद असो किंवा कला प्रत्येकाने आवड म्हणून नक्कीच जपावी. याचा खऱ्या अर्थाने आयुष्यात फायदा होतो. कधीच एकटेपणाचे भावना मनात येत नाही. ज्या गोष्टी करण्यास आवडतात त्या केल्याने मनाला शांती मिळते, मनं प्रसन्न होते. यासाठीच आयुष्यात कलेची जोड असावी असेही पूनम सांगतात.

स्वप्नाच्या नगरीत हरवून जावे तसे पूनम चित्राची दुनिया फिरतात, पाहतात आणि रेखाटतात. जसा मुर्तीकार आपल्या हाताने मुर्तीला देवाचे रुप देतो त्याप्रमाणे पूनम देखील आपल्या स्केचिंगच्या जादूने देवाचे रुप कॅनव्हासवर उतरवतात. पूनम यांनी काढलेल्या गणपती, विठ्ठलच्या स्केचिंगकडे पाहिल्यावर हुबेहुब साक्षात देवाचे दर्शन घडल्यासारखे वाटते. एवढेच नव्हे पूनम यांनी साकारलेल्या अॅक्रॅलिक किंवा पाण्याच्या रंगातील पेटिंग्सचेही कौतूक करण्यासारखे आहे. पेटिंग्स आयुष्यातील दु:ख विसरायला लावून त्यामध्ये रमायला भाग पाडतात. खरंतर, जगभरात वेगवेगळ्या पेटिंग्स पहायला मिळतात. पण मनातून, भावनांमधून आणि हाताच्या कुंचल्यातून निघालेल्या पेटिंग्सची खासियत काही औरच असते. असाच एक किस्सा पुनम यांच्या बालपणीचा आहे. पाचवीत असताना पूनम यांनी सुंदर असे एक वॉटर कलरने राजस्थानी पेटिंग्स काढले होते. यामध्ये घोड्यांसोबत वरात निघाल्याचे चित्र होते.

आठवडाभर पेटिंगवर काम करून ते शाळेच्या प्राध्यापकांना गिफ्ट केले. पण यामुळे वडील नाराज झाले. खरंतर, वडिलांना पूनम यांचे पेटिंग कोणाला द्यायचे नव्हते. वडिलांची नाराजी पाहून पूनम यांनी रातोरात हुबेहुब घोड्यांसोबतच्या वरातीचे चित्र रेखाटले. म्हणतात ना, शिद्दत से चाहो तो सब कुछ मिलता है हेच वाक्य पूनम यांनी खरे करुन दाखवले होते. आयुष्यात आपले चित्रकाराचे स्वप्न साकारताना अनेक अडथळे आले पण अखेर स्वप्न आता साकार झाल्याचा आनंद आज पूनम यांच्या चेहऱ्यावर दिसून येतो. येणाऱ्या ऑक्टोंबर महिन्यात पूनम यांच्या पेटिंग्स प्रत्यक्षात पाहण्याची आणि खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. यासाठीचा पत्ता आणि अन्य माहिती पुढे…

स्थळ : मुंबई एक्झिबिशन हॉल, नेस्को, स्टॉल नंबर जी7, हॉल नंबर 3, गोरेगाव पूर्व, मुंबई. दिनांक : 25, 26 आणि 27 ऑक्टोंबरवेळ : सकाळी 10 ते सायंकाळी 7 (कृपया एक्झिबशनवेळी येताना रांगेत उभे राहण्याएवजी ऑनलाइन पद्धतीने प्री-रजिस्ट्रेशन करुन प्रवेश करू शकता अधिक माहिती साठी मला खालील दिलेल्या मोबाइल क्रमांकवर संपर्क करु शकता

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button