आमची मुंबईमहाराष्ट्रमुंबईराजकीय बातमीविशेषसामाजिक

१६.२४ कोटींच्या फसवणूक प्रकरणात सहाय्यक आयुक्त महेश पाटील निलंबित ओळखपत्र जमा करण्याचे आदेश

जावेद जाफरी यांच्या पत्नीची फसवणूक; महापालिकाच्या सहाय्यक आयुक्तांवर कारवाई अधिकाऱ्यावर गुन्हा

मुंबई : तब्बल १६.२४ कोटी रुपयांच्या कथित जमीन फसवणूक प्रकरणात नाव समोर आल्यानंतर मुंबई महापालिकेच्या के/उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश सुभाष पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे. गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर पालिका प्रशासनाने ही कारवाई केली.

या प्रकरणात अभिनेता जावेद जाफरी यांच्या पत्नी हबीबा जाफरी यांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. पुणेतील प्रकल्पात मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १६.२४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

१३ मे रोजी दाखल झालेल्या तक्रारीनंतर खार पोलीस ठाण्यात महेश पाटील आणि इतरांविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला. फसवणूक, बनावट कागदपत्रांची निर्मिती, विश्वासघात आणि गुन्हेगारी कट रचणे यांसारखे गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.

महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, चौकशी पूर्ण होईपर्यंत महेश पाटील यांना निलंबित करण्यात आले असून त्यांना ओळखपत्र जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या सेवा अभिलेखात नोंद करून मुख्य लेखा विभागालाही माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, चौकशी व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button