शाहू फुले आंबेडकर सामाजिक संस्थेच्या वतीने महापुरुषांच्या जयंतीनिमित्त ,महिलांना बचत मार्गदर्शन,शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन तसेच पत्रकार, खेळाडू यांचा सत्कार

शाहू फुले आंबेडकर सामाजिक संस्थेच्या वतीने महापुरुषांच्या जयंतीनिमित्त ,महिलांना बचत मार्गदर्शन,शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन तसेच पत्रकार, खेळाडू यांचा सत्कार
कार्यक्रमाला एकता मंच उपाध्यक्ष प्रशांत काशीद यांची मुख्य हजेरी
मुंबई,शाहू फुले आंबेडकर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेली चार वर्ष महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आरोग्य शिबीर, शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.दिनांक 17 एप्रिल रोजी महापुरुषांच्या जयंतीनिमित्त महिलांना बचतगटाच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी विशेष बचतगत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.अंगणवाडी सेविका मुंबई अध्यक्षा वसीमा काझी यांनी विशेष मार्गदर्शन करून महिलांना बचत गटांची माहिती दिली.या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रशांत काशीद यांनी संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या तसेच महिलांना विद्यार्थ्यांना लागेल तेव्हा मदत करू असे सांगितले.तसेच संस्थेच्या माध्यमातून पहिली ते 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा,सामान्य ज्ञान विषयावर परीक्षा घेऊन प्रथम 7 विद्यार्थ्यांना रोख रक्कम बक्षीस तसेच सहभागी 100 विद्यार्थ्यांना मोफत वही वाटप करण्यात आले.

विद्यार्थ्यांना बक्षिसे कार्यक्रमाला उपस्थित एकता मंच उपाध्यक्ष प्रशांत काशीद, युवा नेते अंकित सुतार,केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचे स्वीय सहाय्यक सतिष निकाळजे ,डॉ नॅक्सन नाटके मुंबई विभागीय काँग्रेस कमिटी महासचिव ,श्री.हारबादेवी ट्रस्ट अध्यक्ष महेश पाटील,मुंबई मच्छिमार काँग्रेस अध्यक्ष धनाजी कोळी,भारतीय मच्छिमार काँग्रेस कमिटी सरचिटणीस संतोष कोळी,प्रोफेसर सुरेंद्र चौधरी,समाज सेविका संगीता कोळी, वंचित बहूजन आघाडी महिला वॉर्ड अध्यक्षा साधना भंडारी,यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले तसेच या प्रसंगी संस्थेमार्फत महिलांना शिलाई मशीन ,साडी देण्यात आली. तसेच या प्रसंगी जागतिक पातळीवर स्केटिंग मध्ये अव्वल स्थान पटकवणारे जीशहान शेख ,पत्रकार नागेश कळसगौंडे यांचा सत्कार प्रशांत काशीद यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अमोल गौतम भालेराव यांनी सांगितले की महिलांना, विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन देण्याचे हे कार्य सतत पुढे चालत राहील तसेच उपस्थित सर्व प्रमुख पाहुणेचे आभार व्यक्त केले.या प्रसंगी संस्थेचे सचिव अविनाश ओवळे,खजिनदार नितीन मोहिते,उपसचिव गजानन बनसोड,उपाध्यक्ष सुरज भालेराव ,सल्लागार सचिन जाधव, उपखजिनदार देवानंद शिरसाट, शैलेश कांबळे,गौतम,मयूर मोहिते आदीजण उपस्थित होते..



