Uncategorized

वनराई स्पोर्टस क्लब आयोजित क्रिकेट सामने संपन्न भाई मिर्लेकर यांच्या हस्ते पूजन व श्रीफळ वाढवून झाली होती सुरुवात

वनराई स्पोर्टस क्लब आयोजित क्रिकेट सामने संपन्न
गोरेगाव पूर्वेकडील वनराई कॉलोनीमध्ये दिनांक २७ फेब्रुवारी २०२२ रोजी वनराई स्पोर्टस क्लब आयोजित बॉक्स क्रिकेट सामन्यांचा शुभारंभ शिवसेनेचे जोगेश्वरी विधानसभा समन्वयक भाई मिर्लेकर यांच्या हस्ते पूजन व श्रीफळ वाढवून करण्यात आला. भाई मिर्लेकर यांनी सहभागी संघाना शुभेच्छा देऊन आयोजक अध्यक्ष – संतोष चव्हाण, सचिव – अजित मढवी, खजिनदार – दीपक कुडाळकर यांचे आभार मानले.


एकूण सोळा संघाने भाग घेतलेल्या या स्पर्धेत प्रथम क्रमांक – कट्टा बाॅईज – जोगेश्वरी
द्वितीय क्रमांक- DSP बाॅईज – मालाड या संघाने पारितोषिक मिळविले.
शिवसेना महिला विधानसभा संघटक श्रीमती शालिनीताई सावंत यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. याप्रसंगी उपशाखासंघटक श्रीमती सुप्रिया लाड आणि विविध मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button