महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अंधेरी पश्चिम विधानसभा विभाग अध्यक्ष मसल मॅन मनिष धूरी यांचा बद्दल मनसेसाठी चांगली बातमी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अंधेरी पश्चिम विधानसभा विभाग अध्यक्ष मसल मॅन मनिष धूरी यांचा बद्दल मनसेसाठी चांगली बातमी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनिष धूरी यांची काढली समजूत
विद्यार्थी सेने पासून मनिष धुरी राज ठाकरे यांच्या सोबतच
मुंबई महानगर पालिका निवडणुक आधी मनसेला अंधेरी पश्चिम मधुन मोठा झटका लागल्याची बातमी २६ फेब्रुवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आपला राजीनामा पाठवला होता. मनसे चे अंधेरी पश्चिम विधानसभा विभाग अध्यक्ष मसल मॅन म्हणुन ओळख असलेले मनिष धुरी यांनी आपल्या वैयतिक कारणामुळे राजीनामा दिल्याची बातमी समोर आली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मनिष धुरी यांना शिवतीर्थ वर बोलावून घेत त्यांची समजूत काढली असून मनिष धुरी यांचा राजीनामा मंजूर केला असून पुन्हा नव्या जोमाने नव्या जोषाने आणि नव्या उत्साहाने काम करण्याचे आदेश दिले.

यावेळी मनिष धुरी यांनी बोलताना माझे दैवत मा. राज साहेब ठाकरे यांनी आज शिवतीर्थ येथे बोलून मला समज दिली व मी अनावधनाने घेतलेला राजीनाम्याचा निर्णय मागे घेत असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना मध्येच काम करणार असल्याचे अंधेरी पश्चिम विधानसभा विभाग अध्यक्ष मसल मॅन मनिष धुरी यांनी सांगितले



