आमची मुंबईमनोरंजनमहाराष्ट्रमुंबईविशेषशैक्षणिकसामाजिक

*झाले जलमय… ह्या कथासंग्रहा विषयी*

.सारे जलमय झाले आहे. नियतीचा खेळ ,त्यावर आपल्या आयुष्याची-स्वप्नांची नौका हेलकावे घेत आहे

*झाले जलमय… ह्या कथासंग्रहा विषयी

झाले जलमय…‌हा डाँ. सुचिता पाटील ह्यांचा पहिला कथासंग्रह! या आधी त्यांनी अनेक साहित्य प्रकार हाताळले आहेत. त्यांची शब्दाची गुंफण त्यातून व्यक्त होणारी भावना आणि आशय या दृष्टिकोनातून हे शिवधनुष्य लिलया पेलल्याची जाणीव होते व प्रज्ञा-प्रतिभेची प्रचिती येते.पुस्तक हाती आल्याबरोबर श्री. किशोर पाटील यांचे मूखपृष्ठ आपलं मन मोहून घेतं. कथेचा आशय मूखपृष्ठावर चफखलपणे व्यक्त झाल्याचे जाणवते.

     …सारे जलमय झाले आहे. नियतीचा खेळ ,त्यावर आपल्या आयुष्याची-स्वप्नांची नौका हेलकावे घेत आहे….तरीही ह्या कथा नियतीवादी-दैववादी नाहीत तर संधी मिळताच अपार प्रयत्नाने जीवनाचे परिवर्तन घडवून आणणा-या व्यक्ति चित्रांच्या कथा आहेत. चिखल मातीचा भोग वाट्यास आला तरी बरसणा-या पावसाने हिरवेगार झालेले क्षण, भावना, संवेदना.. ह्यांची सुरेखशी गुंफण कथेत आहे. जी मूखपृष्ठावरील चित्रातून अचूक व्यक्त झाली आहे.

 

विशाल धर्माधिकारी(कवी, लैखक)

कथेला अनुसरुन साकारलेले मूखपृष्ठ औचित्यपूर्ण आहे.

*अनौचित्यदृतेनान्यंम् द्रसभंगस्य कारणम्!* ह्याची जाण मूखपृष्ठकाराला बहुदा असावी.

पुस्तकातील कथा दीर्घ कथा प्रकारातील नसल्या तरी, व्यापक आशय व्यक्त करणा-या आहेत.‌आत्मभान निर्माण करणा-या आहेत.

शेक्सपीयर चा हँम्लेट आत्मघाती ठरला कारण त्याला कुणी भानावर आणणारा नव्हता..रोहित पारकर ही कथा वाचताना रोहितला एक शिक्षिका -सानिका आई होऊन समजावणं आणि त्याचं आत्महत्येचं मत परिवर्तन होऊन तो सी. ए. होणं येथे शेक्सपीयर आणि लेखिकेचे वेगळेपण आहे.शेक्सपीयरची पात्र ब-याचदा परीस्थिती व स्वभावाच्या गुंत्यातून आत्मनाशाकडे जातात आणि ती शोकांतिका होते. तर लेखिकेच्या कथा नायकाला कुणीतरी आत्मभान निर्माण केल्याने आणि प्रसंगी सहकार्य केल्याने सुखात्मिका होते.

खरं प्रेम ही कथा वाचताना, अल्ताफ राजा चे, “तुम तो ठेहरे परदेसी साथ क्या निभाओगे….” हे गीत मनात रूंजी घालू लागतं. नवी पहाट, श्रीधर जालिंदर वाघमारे….एक ना अनेक कथा मनात घूमू लागतात.

लेखिकेने ह्या घडलेल्या घटना शब्दबद्ध केल्याने मनोगतातून समजते. ह्या वरून लेखिकेची निरिक्षण करण्याची सूक्ष्म बुद्धी आणि ती घटना शब्दबद्ध करण्याची शैली उत्तम.

उत्तम कथा, उत्तम मूखपृष्ठ, उत्तम कागद आणि उत्तम बांधणी असा सर्वोत्तम कथासंग्रह साकारला आहे.

उत्तम कवी म्हणून काव्याच्या प्रांतात स्वैर विहार करणा-या , डाँ. सुचिता पाटील ह्यांच्या ह्या कथासंग्रहाने उत्तम कथाकार म्हणूनही नाव लौकिक व्हावा आणि अशीच मराठी साहित्याची सेवा त्यांच्याकडून अखंड घडावी. ह्या साठी शुभेच्छा नि स्वामी समर्थांकडे प्रार्थना!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button