आमची मुंबईदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईविशेषसंपादकीयसामाजिक

*कार्यसम्राट पुरस्कार २०२५ भाकर फाउंडेशनच्या ॲड. दीपक सोनावणे यांना प्रदान*

"हा पुरस्कार केवळ माझ्या कार्याची पावती नाही, तर आपणा सर्वांच्या पाठिंब्याची आणि एकत्रित लढ्याची मान्यता- ॲड. दीपक सोनावणे

*कार्यसम्राट पुरस्कार २०२५ भाकर फाउंडेशनच्या ॲड. दीपक सोनावणे यांना प्रदान*

पुणे | महिला सक्षमीकरण आणि बालहक्कांसाठी झटणाऱ्या भाकर फाउंडेशनच्या कार्याला सम्राट अशोक फाउंडेशनकडून “कार्यसम्राट पुरस्कार २०२५” देऊन गौरविण्यात आले आहे. हा पुरस्कार भाकर फाउंडेशनचे संस्थापक ॲड. दीपक सोनावणे यांना देण्यात आला असून, त्यांच्या सामाजिक कार्याला मिळालेली ही मान्यता अत्यंत प्रेरणादायक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

 

हा पुरस्कार सोहळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त २७ एप्रिल रोजी पुण्यात पार पडला. मात्र, प्रकृती ठीक नसल्यामुळे ॲड. सोनावणे या कार्यक्रमास प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. त्यानंतर पुणे कॅम्प येथे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा. रवीभाऊ दांडले यांच्या शुभहस्ते, फुले पगडी आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या वेळी कार्यक्रमाचे आयोजक आणि सम्राट अशोक फाउंडेशनचे संस्थापक कुमार चक्रे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय – खडकवासला विधानसभाचे हनुमंत शूर, सुरज लोणारे आणि ज्योतिबा सावित्री फाउंडेशनचे संस्थापक सुदर्शन चकाले उपस्थित होते.

पुरस्काराबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना ॲड. दीपक सोनावणे म्हणाले, “हा पुरस्कार केवळ माझ्या कार्याची पावती नाही, तर आपणा सर्वांच्या पाठिंब्याची आणि एकत्रित लढ्याची मान्यता आहे.”

ते पुढे म्हणाले की, “समाजकार्याच्या प्रवासात मिळालेली ही ओळख मला अधिक जबाबदारीने कार्य करण्याची प्रेरणा देते.”

 

सम्राट अशोक फाउंडेशन आणि सर्व आयोजकांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले असून, “आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि साथ अशीच लाभो,” अशी प्रार्थनाही त्यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button