मुंबई उपनगरचे पालक मंत्री ॲड आशिष शेलार यांनी केला रस्ते कामांचा पाहणी दौरा
३१ मे पर्यंत ही सगळी कामे संपली पाहिजे - ॲड आशिष शेलार

मुंबई उपनगरचे पालक मंत्री ॲड आशिष शेलार यांनी केला मुंबई उपनगर रस्ते कामांची पाहणी दौरा

मुंबई – मुंबई उपनगरातील रस्त्यांची पाहणी आजपासून सुरू केली असून पाहणी दरम्यान वांद्रे पश्चिम येथील १४ व्या रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले. हा रस्ता पूर्ण खोदून ठेवलेला आहे. २० मे नंतर कोणत्याही रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे नवीन काम सुरु करु नका, कारण पावसाळ्याच्या तोंडावर केलेली तात्पुरती कामे पुन्हा उखडण्याचा धोका असतो. ३१ मे पर्यंत ही सगळी कामे संपली पाहिजेत असे संबंधित विभागांना निर्देश ॲड आशिष शेलार यांनी दिले.

रस्ता क्र. २६ चे काम पूर्ण झाले असून, अशाच पद्धतीने इतरही अपूर्ण रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण करा असे ॲड आशिष शेलार यांनी निर्देश दिले.
यावेळी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर, माजी नगरसेविका स्वप्ना म्हात्रे, माजी नगरसेविका हेतल गाला, उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष विरेंद्र म्हात्रे आणि भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




