आमदार ज. मो. अभ्यंकर यांच्या निधीतून एकता मंचतर्फे बेंच व डस्टबिन डब्ब्यांचे वाटप
प्राचार्य अजय कौल सर यांनी ज्याच्या डोक्यावर हात ठेवला तो आमदार झाला मी आणि आमदार ज. मो. अभ्यंकर याचे उदाहरण - हारुन खान ( वर्सोवा विधानसभा आमदार

आमदार ज. मो. अभ्यंकर यांच्या निधीतून एकता मंचतर्फे बेंच व डस्टबिन डब्ब्यांचे वाटप
एकता मंचच्या वतीने चर्मकार बांधवांना मोठ्या छत्रीचे केले वाटप
प्राचार्य अजय कौल सर यांनी ज्याच्या डोक्यावर हात ठेवला तो आमदार झाला मी आणि आमदार ज. मो. अभ्यंकर याचे उदाहरण – हारुन खान ( वर्सोवा विधानसभा आमदार)
मुंबई, दिनांक — शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिक्षक मतदार संघाचे आमदार ज. मो. अभ्यंकर यांच्या विकास निधीतून समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत एकता मंच चे अध्यक्ष प्राचार्य अजय कौल यांच्या माध्यमातून नागरिकांना बेंच व डस्टबिन डब्ब्यांचे वाटप करण्यात आले. तर जिवनाधार फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष राजेश खाडे यांच्या विनंतीवरून एकता मंचच्या वतीने चर्मकार बांधवांना उन , वारा , पावसापासून वाचनासाठी मोठ्या छत्रीचे केले वाटप

—
कार्यक्रमाचे ठळक मुद्दे :
🚩 आमदार ज. मो. अभ्यंकर यांच्या विकास निधीतून उपक्रमाची अंमलबजावणी
🚩 एकता मंच चे अध्यक्ष प्राचार्य अजय कौल यांचा पुढाकार
🚩 परिसरातील नागरिकांसाठी बेंच उपलब्ध → बसण्याची सोय
🚩 डस्टबिन डब्ब्यांचे वाटप → स्वच्छतेबाबत जनजागृत
🚩 समाजहिताचे विधायक कार्य पुढे नेण्याचा संकल्प
🚩 एकता मंचच्या वतीने चर्मकार बांधवांना उन , वारा , पावसापासून वाचनासाठी मोठ्या छत्रीचे केले वाटप
—
मान्यवरांचे उद्गार :

आमदार ज. मो. अभ्यंकर म्हणाले :
“जनतेच्या गरजा लक्षात घेऊन निधीचा वापर केला जात आहे. परिसर स्वच्छ, सुंदर आणि नागरिकाभिमुख व्हावा यासाठी अशा उपक्रमांना प्राधान्य दिले जाणार आहे.” आज मुंबई मध्ये मोठ्या प्रमाणात श्रीमंत आहेत परंतु त्यांच्या कडे असलेल्या पैश्याचा वापर आणि उपयोग हा फक्त त्यांच्या स्वत साठी , परिवारासाठी आणि जवळच्या व्यक्ति साठी होतो. पण प्राचार्य अजय कौल सर हे आपल्या उत्पन्नाचा मोठा वाटा समाजासाठी आणि गोर गरीब जनतेच्या सोयी सुविधा साठी वापरत आहेत.

हारुन खान म्हणाले: आज मी आणिआमदार ज. मो. अभ्यंकर हे प्राचार्य अजय कौल सर यांच्या आशीर्वादानेच आमदार झालो आहोत आणि त्यांच्या कामाचे मोल होऊच शकत नाही. आम्ही प्राचार्य अजय कौल सर यांना पद्मश्री देण्यात यावा अशी मागणी केली असून त्याचा पाठपुरावा करत आहोत

एकता मंच चे अध्यक्ष प्राचार्य अजय कौल सर म्हणाले: “स्वच्छ परिसर हीच खरी प्रगती आहे. नागरिकांनी या सुविधांचा योग्य वापर करून परिसराची स्वच्छता टिकवावी हे आपले सामूहिक कर्तव्य आहे. आमदार ज. मो. अभ्यंकर आभार यांचे मानतो कारण वर्सोवा येथील स्थानिक रहिवाशांनी माझ्या कडे सोसायट्यांमध्ये बसण्यासाठी बेंच व डस्टबिन डब्ब्यांची मागणी केली होती आणि त्या अनुषंगाने मी आमदार ज. मो. अभ्यंकर यांच्या कडे त्यांच्या निधीतून ते उपलब्ध करून देण्यात यावे अशी विनती करताच 50 सोसायटी साठी ते उपलब्ध करून देण्यात आले यासाठी आमदार ज. मो. अभ्यंकर यांचे आभार मानले तर डस्टबिन डब्ब्यांची मागणी वाढली असल्याचे सांगत स्थानिक आमदार हारुन खान यांनी देखील 50 सोसायट्या साठी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे देखील आभार मानत उर्वरित सोसायटी यांना देखील लवकरच वाटप होणार असल्याचे सांगितले
—

उपक्रमाचा फायदा :
👉 नागरिकांना बसण्यासाठी सोयीस्कर सुविधा उपलब्ध
👉 परिसरातील स्वच्छता आणि जनजागृतीला चालना
👉 सामाजिक बांधिलकी व सामूहिक जबाबदारीची जाणीव

📢 सदर उपक्रम चिल्ड्रन वेलफेअर सेंटर च्या ऑर्किड शाळेतल्या हॉल मध्ये सम्पन्न झाला. हा उपक्रम परिसरातील लोकांसाठी आशेचा किरण ठरत असून, स्वच्छता आणि सुविधा यांचा उत्तम संगम साधणारा आहे.



