मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमीत साटमांचा विश्वास सार्थ; वॉर्ड ६५ मधून सामान्य कार्यकर्ता विठ्ठल बंदेरी नगरसेवक
काँग्रेसचा गड कोसळला; वॉर्ड ६५ मध्ये भाजपच्या विठ्ठल बंदेरींचा दणदणीत विजय

मुंबई – मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी टाकलेला विश्वास विठ्ठल बंदेरी यांनी पूर्णपणे सार्थ ठरवला आहे. मुंबई महानगर पालिका निवडणूक मध्ये वॉर्ड क्रमांक ६५ मधून भाजपचा एक सामान्य कार्यकर्ता नगरसेवक झाला असून विठ्ठल बंदेरी यांचा तब्बल ३५ वर्षांचा संघर्ष, संघटनात्मक बांधिलकी आणि सामाजिक कार्य अखेर जनतेच्या विश्वासास पात्र ठरला आहे.

काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या वॉर्ड क्रमांक ६५ मधून विठ्ठल बंदेरी यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार प्रसाद आयरे तसेच मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहसीन हैदर यांचे चिरंजीव सूफियान हैदर यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे वॉर्ड क्रमांक ६५ मधील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून भाजपने काँग्रेसच्या गडाला सुरुंग लावल्याचे चित्र आहे.

विठ्ठल बंदेरी यांच्या विजयामुळे संपुर्ण आंबोलीकर यांना आनंद झाला असून साधा कार्यकर्ता देखील नगरसेवक होऊ शकतो हे उदाहरण आहे.
सामान्य कार्यकर्त्यापासून नगरसेवकापर्यंतचा विठ्ठल बंदेरी यांचा प्रवास हा भाजपच्या संघटनशक्तीचे आणि कार्यकर्त्यांवरील विश्वासाचे जिवंत उदाहरण ठरत आहे. या ऐतिहासिक विजयामुळे वॉर्ड क्रमांक ६५ मध्ये भाजपचे स्थान अधिक भक्कम झाले असून आगामी काळात विकासकामांना वेग मिळेल, असा विश्वास पक्ष पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.




