महाराष्ट्रमुंबईविशेषसामाजिक

दि कुर्ला नागरिक सहकारी बैंक लिमिटेडचा IFSC कोड कार्यान्वित

नवीन सुविधेचे उद्घाटन आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या हस्ते बँकेचे अध्यक्ष तुकाराम धोंडे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न

दि कुर्ला नागरिक सहकारी बैंक लिमिटेडचा IFSC कोड कार्यान्वित

 

दि कुर्ला नागरिक सहकारी बैंक लिमिटेड चा IFSC कोड अधिकृतपणे कार्यान्वित करण्यात आला असून कुर्ला सगो बर्वे शाखेत नवीन सुविधेचे उद्घाटन आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या हस्ते बँकेचे अध्यक्ष तुकाराम धोंडे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

 

यावेळी अनिल गलगली यांनी अध्यक्ष, संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचारी यांचे आभार मानले. तसेच सभासद व खातेदारांनी नवीन खाते उघडणे तसेच डिपॉझिट वाढीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.

 

या प्रसंगी बँकेचे अध्यक्ष तुकाराम धोंडे पाटील, संचालक बाळासाहेब काटकर, गणेश विरकर, संजय पवार, वालचंद माने, मोहन गव्हाणे, शेखर भोसले, अमोल शेडगे, माधव गडदे, गोपाळ शेलार, बाळासाहेब पुकळे, वनिता साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत अभंग, IT सहाय्यक सरव्यवस्थापक पियुष महाजन, शाखाधिकारी सुनिल पोळ, तुषार कदम उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button