आमची मुंबईमहाराष्ट्रमुंबईविशेषशैक्षणिकसामाजिक

मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी कूपर रुग्णालयातील आरोग्य सेवांचा घेतला सविस्तर आढावा

कूपर रुग्णालयातील आरोग्य सेवांचा विस्तार, आधुनिक सुविधा आणि आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आमदार अमित साटम यांच्या या पाहणीला आले विशेष महत्त्व

मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी कूपर रुग्णालयातील आरोग्य सेवांचा घेतला सविस्तर आढावा

 

कूपर रुग्णालयातील आरोग्य सेवांचा विस्तार, आधुनिक सुविधा आणि आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आमदार अमित साटम यांच्या या पाहणीला आले विशेष महत्त्व

मुंबई, २७ ऑगस्ट २०२६ : मुंबई भाजप अध्यक्ष व आमदार अमित साटम यांनी आज कूपर रुग्णालयाला भेट देत रुग्णालयातील आरोग्य सेवा, उपलब्ध सुविधा, मनुष्यबळ आणि विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी रुग्णांना अधिक दर्जेदार व पारदर्शक आरोग्य सेवा मिळावी, यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

या बैठकीत ८ प्रमुख मुद्द्यांवर त्वरित कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले. यामध्ये १ ऑक्टोबरपासून कडक अटींसह नवीन हाउसकीपिंग टेंडर काढणे, ओपीडी डॉक्टर, नर्सेस व स्टाफसाठी सेन्सिटायझेशन आणि सॉफ्ट स्किल्स कार्यक्रम राबवणे, तसेच एमआयसीयूची क्षमता १० बेडवरून २५ बेडपर्यंत वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या.

 

एनआयसीयूमध्ये आउटबॉर्न बालकांसाठी टेंडर प्रक्रिया सुरू करणे, प्रगतीपथावर असलेले किमोथेरपी सेंटर लवकरात लवकर पूर्ण करणे आणि पुढील तीन महिन्यांत तब्बल ७०० पदांची भरती करण्याचे निर्देशही आमदार अमित साटम यांनी दिले.

याशिवाय डायलिसिसची क्षमता ६ वरून २० पर्यंत वाढवताना संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्यावर भर देण्यात आला. तसेच GeM द्वारे फिक्स आणि मोबाईल एक्स-रे मशीनसाठी री-टेंडर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

 

आमदार साटम यांनी यावेळी कूपर रुग्णालयातील बर्न्स विभाग तसेच कार्डियाक विभागातील अँजिओप्लास्टी सुविधेचाही आढावा घेतला. रुग्णालयातील सुविधा अधिक सक्षम करून नागरिकांना वेळेत आणि गुणवत्तापूर्ण उपचार मिळावेत, यासाठी प्रशासनाने ठोस आणि वेळबद्ध पावले उचलावीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

या प्रसंगी कूपर हॉस्पिटलच्या डीन डॉ. छाया शिंदे, महापालिका आरोग्य विभागाचे उपायुक्त शरद उघाडे, नगरसेवक दीपक कोतेकर, विठ्ठल बंदेरी, अनीष मकवानी, नगरसेविका सुनिता मेहता, सुधा सिंह, तसेच सरिता राजपुरे, विश्वजित चांद, भवन कामतेकर आणि समीर साटम उपस्थित होते.

 

कूपर रुग्णालयातील आरोग्य सेवांचा विस्तार, आधुनिक सुविधा आणि आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आमदार अमित साटम यांच्या या पाहणीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button